39.2 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » गरजूंना मोफत कायदेशीर सेवा देणारे अनोखे कायदा सहाय्य चिकित्सालय सुरु
महाराष्ट्र

गरजूंना मोफत कायदेशीर सेवा देणारे अनोखे कायदा सहाय्य चिकित्सालय सुरु

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचा समाजोपयोगी उपक्रम

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गरजूंना मोफत कायदेशीर सेवा देण्यासाटी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या विधि महाविद्यालयात अनोखी संकल्पना साकारत कायदा सहाय्य चिकित्सालयाची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी झालेल्या उद्घाटन सोहळ्यास कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश व मुंबई जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव सतीश हिवाळे प्रमुख पाहुणे होते तर अध्यक्षस्थानी बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य अॅड. जयंत जायभावे होते. महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे माजी चेअरमन अॅड. विठ्ठल कोंडे-देशमुख आणि अॅड. सुभाष घाटगे यांचीही यावेळी उपस्थिती होती.
संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार काटकर आणि जनरल सेक्रेटरी अॅड. आप्पासाहेब देसाई यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या कायदा चिकित्सालयात सोमवार ते शनिवार गरीब व गरजूंना मोफत कायदेशीर सल्ला दिला जाईल. ज्याप्रमाणे शारिरीक व्याधीसाठी आपण प्राथमिक आरोग्य केंद्रात जातो, त्यानुसारच सामाजिक स्वास्थ्यासाठी ही कायदा चिकित्सालयाची संकल्पना प्रत्यक्षात साकारली जात असून गरजूंना अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन अॅड. आप्पासाहेब देसाई यांनी याप्रसंगी बोलताना केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. विजय चव्हाण, प्रा. अॅड. सचिन बोटे, विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व घाणेकर यांनी परिश्रम घेतले.

Related posts

दैनिक यशोभूमि के उपसंपादक बी एन गिरि लिखित टीएमसी नेता की जीवनी ‘सबके चहेते भूषण दा’ का विमोचन संपन्न

Bundeli Khabar

शांतनु भामरे और एलेना टुटेजा ने मनाया ‘तेरी आशिकी में’ अल्बम के 1 मिलियन व्यूज की सफलता का जश्न

Bundeli Khabar

मोनिश शर्मा, भूमिका कागरा यांची राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!