38.2 C
Madhya Pradesh
May 29, 2024
Bundeli Khabar
Home » “हुनर” तर्फे महिलांच्या एकत्रीकरणाचा कार्यक्रम संपन्न
महाराष्ट्र

“हुनर” तर्फे महिलांच्या एकत्रीकरणाचा कार्यक्रम संपन्न

मुंबई : हुनर ​​बिझनेस नेटवर्क गृहिणींना तसेच व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना व्यवसायाचे व्यासपीठ उपलब्ध करून देते आणि त्यानिमित्ताने पोलीस जिमखाना, मरीन ड्राइव्ह येथे ईद मेजवानी आणि महिला एकत्रीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या संस्थापक शगुफ्ता मुमताज आणि संस्थेचे संचालक आसिफ नूर हसन यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच इतर कौशल्ये कशी विकसित करावीत, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड भागातील महिलांना संघटित करून त्यांची उद्योजकता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आज झालेल्या कार्यक्रमात गायिका राधिका यांनी मराठी आणि हिंदी गीतं सादर करून रसिकांची मनं जिंकली. तर व्यवसायाने वकील असलेल्या आयेशा सिद्धिकी यांनी बहारदार नृत्य करून रसिकांची दाद मिळवली. सांस्कृतिक कार्यक्रमांची मादियाळी चालू असतानाच महिलांसाठी विविध खेळांचे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सर्वांनीच हिरिरीने सहभाग नोंदवला आणि कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आरिफा शेख, फरहीन खान, डॉ. शुभांगी अदाटे, सुमैय्या हमिदानी, तरन्नूम खान, तसनीम रानीवाला, हिना जेहरा सईद, रेहाना पाववाला, शबाना मन्सुरी, झैनब बुटवाला, आयेशा वारेकर, प्रार्थना मेश्राम, मुनीरा साळुंबरवाला, सकीना इक्बाल, हिना सय्यद, अर्वा राजकोटवाला, सफिया माचिसवाला, रूबीना शेख, सफिआ फरीद, आयेशा शेख, गौरी तनवानी, डॉ. स्मिता नगरकर, आलिया सैन, फौझीया घोजारीया, रूखसार पटेल, आमरीन कुरेशी आणि नाझनीन कबाले यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Related posts

फॅमिली बॉईज ग्रुप ची पूरग्रस्तांना मदत.

Bundeli Khabar

जिला परिषद के महिला एवं बाल विकास विभाग द्वारा आयोजित ‘पोषण माह सितंबर 2021’ अभियान के उद्घाटन

Bundeli Khabar

स्टेडफास्ट न्युट्रिशन बनला आयएचएफएफचा ‘प्रेझेटिंग पार्टनर’

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!