23.3 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » स्टेडफास्ट न्युट्रिशन बनला आयएचएफएफचा ‘प्रेझेटिंग पार्टनर’
महाराष्ट्र

स्टेडफास्ट न्युट्रिशन बनला आयएचएफएफचा ‘प्रेझेटिंग पार्टनर’

आशियातील सर्वात मोठा आरोग्य, क्रीडा आणि फिटनेस उत्सव

मुंबई : बॉम्बे कन्व्हेंन्शन अँड एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित केल्या जात असलेल्या आशियातील सर्वात मोठ्या आरोग्य, क्रीडा आणि फिटनेस उत्सवासाठी पुन्हा एकदा स्टेडफास्ट न्युट्रिशनची ‘प्रेझेंटिंग पार्टनर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. आएचएफएफ (इंटरनॅशनल हेल्थ स्पोर्ट्स अँड फिटनेस फेस्टिव्हल)द्वारे आयोजित केल्या जात असलेल्या ऑलिम्पिया अमॅच्युअर इंडिया, शेरू क्लासिक या अजिंक्यपद स्पर्धांकडे जगभरातील अथलीट्स (क्रीडापटू) , फिटनेसप्रेमी, विविध व्यवसाय आणि प्रेक्षकांचे लक्ष लागलेले आहे. त्यांना ताकद, आरोग्याचे प्रदर्शन करण्यासोबतच आयुष्याचा उत्सवही साजरा करता येणार आहे. हा कार्यक्रम ५ डिसेंबर २०२१ म्हणजेच तीन दिवसांपर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमात जगभरातील १००० पेक्षा अॅथलीट्स सहभागी होत आहेत.

स्टेडफास्ट न्युट्रिशनचे संस्थापक अमन पुरी यांनी सांगितले की, “स्टेडफास्टद्वारे या कार्यक्रमाच्या आयोजनामागे अनेक हेतू होते. त्यात देशाच्या भावी पीढीचे भवितव्य घडवणे तसेच तरुणाईची ऊर्जा उत्पादकतेकडे वळवणे आणि भारतीय बॉडीबिल्डर्सना जगाच्या नकाशावर आणणे यांचा प्रामुख्याने समावेश होता. या भव्यदिव्य कार्यक्रमाचे मुख्य सादरकर्ते म्हणून अवघ्या बॉडीबिल्डिंग (शरीरसौष्ठव) समुदायाला भरभक्कम पाठबळ देण्याचे स्टेडफास्टचे उद्दिष्ट आहे. कंपनी बॉडीबिल्डर्सना बदलत्या पोषणविषयक गरजांबाबत शिक्षित करू इच्छित आहे. सन २०५० पर्यंत भारताला जगाची क्रीडा राजधानी बनवण्याचे विशाल ध्येय कंपनीने समोर ठेवले आहे.“

ऑलिम्पिया अमॅच्युअर ही बॉडीबिल्डिंगच्या विश्वातील सर्वात मोठी अजिंक्यपद स्पर्धा मिस्टर ऑलिम्पियाकडे नेणारा मार्ग असल्याचे समजले जाते. ऑलिम्पिया अॅमॅच्युअर स्पर्धेत, मेन्स बॉडीबिल्डिंग, मेन्स क्लासिक फिजिक, वुमन्स फिगर, वुमन्स फिजिक, वुमन्स बिकिनी, वुमन्स फिटनेस, वुमन्स वेलनेस अशा अनेक श्रेणींचा समावेश राहणार आहे. एकूण २४ आयएफबीबी प्रो कार्ड्ससाठी प्रत्येक विभागात ३ प्रो कार्ड्सचे बक्षीस विजेत्यांना दिले जाणार आहे. शेरू क्लासिक प्रो क्वॉलिफायर्स सीरिज या दुसऱ्या स्पर्धेत बिकिनी मॉडेल हंट आणि मेन्स क्लासिक फिजिक अशा दोन श्रेणी असणार आहेत.

वेगाने विकसित होत असलेल्या भारताच्या आरोग्य आणि वेलनेस उद्योगाशी संबंधित हा कार्यक्रम सर्वाधिक लोकप्रिय आणि धोरणात्मक आयोजन आहे. आयएचएफएफ २०२१ सोहळा या उद्योगक्षेत्रातील सर्वच महत्त्वाच्या भागीदारांना एकाच माळेत गुंफणार आहे. इतकेच नव्हे तर हा सोहळा प्रदर्शकांना एक अद्वितीय वन-टू-वन व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. त्याच्या माध्यमातून ते आपले आधीचे ग्राहक तसेच भविष्यातील व्यवसायाच्या नव्या संधी किंवा भागीदारांशी संवाद साधू शकतील.

Related posts

राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

Bundeli Khabar

एसआयपी अकॅडमीच्या साहाय्याने कोविडच्या काळात महिलांचे सक्षमीकरण

Bundeli Khabar

बसपा का महापौर बनाएंगे संदीप ताजने, उत्तरभारतीयों को पूरा सहयोग करेगी बसपा

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!