21.9 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » टाटा आयपीएल – लखनौ सुपर जायंट्स ३६ धावांनी विजयी
खेल

टाटा आयपीएल – लखनौ सुपर जायंट्स ३६ धावांनी विजयी

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा सदतीसवा सामना मुंबई इंडिअन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. लखनौ सुपर जायंट्सने ३६ धावांनी हा सामना जिंकला. मुंबई इंडिअन्स ने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. लखनौ सुपर जायंट्सकडून क्विंटन डीकॉक आणि कर्णधार के. एल. राहुल उतरले. क्विंटन डीकॉकला जसप्रित बुमराहने झटपट तंबूचा रस्ता दाखवला. ९व्या षटकाच्या अखेरीस लखनौच्या ५० धावा पूर्ण झाल्या. मनीष पांडेसोबत राहुलची जोडी चांगली जमली होती. ११व्या षटकात त्यांची अर्धशतकी भागीदारी झाली. त्याच षटकाच्या अखेरीस राहुलने वैयक्तिक ५० धावा केवळ ३७ चेंडूंत पूर्ण केल्या. संथ खेळत असलेल्या मनीष पांडेला किरॉन पोलार्डने २२ धावांवर बाद केले. मार्कस स्टॉईनिश फलंदाजीसाठी खेळपट्टीवर उतरला. त्याला डॅनिअल सॅमने शून्यावर परत पाठवले. कर्णधार के. एल. राहुलने संपूर्ण २० षटकं मैदानात तळ ठोकला. त्याने १२ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने केवळ ६२ चेंडूंत बिनबाद १०३ धावा काढल्या. त्यामुळेच लखनौचा संघ १६८/६ धावा काढू शकला. किरॉन पोलॉर्डने २-०-८-२, रिले मेरेडिथने ४-०-४०-२, जसप्रित बुमराहने ४-०-३१-१, डॅनिअल सॅमने ४-०-४०-१ यांनी गडी बाद केले.

मुंबई इंडिअन्सकडून कर्णधार रोहित शर्माने ३९ धावा काढल्या. त्याला कृणाल पांड्याने बाद केले. मुंबईला विजयासाठी २४ चेंडूंत ५९ धावांची गरज होती. तिलक वर्मा आणि किरॉन पोलॉर्ड एकमेकाला चांगली साथ देत होते. १७व्या ह्या दोघांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. १८ षटकाच्या अखेरीस जेसन होल्डरने तिलक वर्माला ३८ धावांवर बाद केले. मुंबईला विजयासाठी १२ चेंडूंत ४४ धावांची गरज होती. अजून अतिरिक्त २० षटकं मुंबई संघाला दिली तर कदाचित ते हा सामना जिंकू शकतील. मुंबईला विजयासाठी ६ चेंडूंत ३९ धावांची गरज होती. कृणाल पांड्याने पहिल्याच चेंडूवर किरॉन पोलॉर्डला १९ धावांवर बाद केले. तिसर्‍या चेंडूवर डॅनिअल सॅमला बाद केले. मुंबईने १३२/८ असा लाजिरवाणा पराभव स्वीकारला.
दोन कर्णधारांची देहबोली, त्यांची फलंदाजी, त्यांची मानसिक सक्षमता यांनीच या सामन्याचा निकाल ठरवला. मुंबईला चौकार आणि षटकारांची गरज असताना त्यांचे फलंदाज एक धाव किंवा चेंडू खेळून काढण्यात धन्यता मानत होते. मुंबई संघांकडून विशेष खेळीची अपेक्षा करणेच चुकीचे आहे. त्यांनी मुंबईतल्या गल्ली क्रिकेटमध्ये खेळून आपल्याला काही खेळता येतंय का हे बघायला हवे.

लखनौचा कर्णधार के. एल. राहुल याला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने बिनबाद १०३ धावा काढल्या होत्या. उद्या पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईला हा सामना जिंकून गुणतक्त्यात आपलं स्थान बळकट करण्याची संधी आहे.


Bundelikhabar

Related posts

टाटा आयपीएल – सनरायझर्स हैदराबादचा जबरदस्त विजय

Bundeli Khabar

राष्ट्रीय जूडो चैंपियनशिप के लिए चंडीगढ़ में देशभर के खिलाड़ी

Bundeli Khabar

भारताची इंग्लंडवर १० गड्यांनी मा

Bundeli Khabar
error: Content is protected !!