36.9 C
Madhya Pradesh
May 5, 2024
Bundeli Khabar
Home » टाटा आयपीएल – सनरायझर्स हैदराबाद थाटात दुसर्‍या स्थानावर विराजमान
खेल

टाटा आयपीएल – सनरायझर्स हैदराबाद थाटात दुसर्‍या स्थानावर विराजमान

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा छत्तीसवा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आला. सनरायझर्स हैदराबादने हा सामना ९ गडी आणि ७२ चेंडू राखून जिंकला. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची वाताहत सामन्याच्या दुसर्‍या षटकातच सुरू झाली. मार्को जानसेनने कर्णधार फाफ ड्यू प्लेसिस, विराट कोहली आणि अनुज रावतला बाद केले. बेंगळुरू ह्या हादर्‍यातून सावरूच शकले नाहीत. सामन्याच्या ९व्या षटकात जगदीशा सुचिथने सुयश प्रभूदेसाईला १५ धावांवर आणि दिनेश कार्तिकला शून्यावर बाद केले. बेंगळुरूचे ४७/६ गडी तंबूत परतले होते. १७व्या षटकाच्या सुरूवातीस बेंगळुरूची धावसंख्या सर्वबाद ६८ होती. आतापर्यंत ह्या मोसमातील ही निच्चांकी धावसंख्या आहे. टी. नटराजनने ३-०-१०-३, मार्को जानसेनने ४-०-२५-३, जगदीशा सुचिथने ३-०-१२-२, भुवनेश्वर कुमारने २.१-०-८-१, उमरान मलिकने ४-०-१३-१ हैदराबादच्या पाचही गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली.

सनरायझर्स हैदराबाद किती मुंबई इंडिअन्स सामना संपवणार याकडेच सार्‍यंचे लक्ष लागले होते. सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने ८ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने २८ चेंडूंत ४७ धावा काढल्या. त्याला हर्षल पटेलने बाद केले. तो बाद झाला तेव्हा हैदराबादला विजयासाठी केवळ ५ धावांची गरज होती. कर्णधार केन विल्यमसनने बिनबाद १६ धावा काढल्या. राहुल त्रिपाठीने बिनबाद ७ धावा काढल्या. सनरायझर्स हैदराबादने ८ व्या षटकाच्या अखेरीस ७२/१ असा आणि ९ गडी आणि ७२ चेंडू राखून जिंकला.
मार्को जानसेनला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने २५ धावांत ३ गडी बाद केले होते.

उद्या लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडिअन्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मुंबई इंडिअन्स मानसिक स्तरावर पराभूत संघ आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता खूपच कमी आहे. तर लखनौचा संघ भरारी घेण्यासाठी तयार आहे.

Related posts

राष्ट्रीय जूडो चैंपियनशिप के लिए चंडीगढ़ में देशभर के खिलाड़ी

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – लखनौ ठरले सुपर जायंट्स

Bundeli Khabar

राज्यस्तरीय ज्युडो चॅम्पियनशिप सांगलीत रंगणार

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!