33.6 C
Madhya Pradesh
May 21, 2024
Bundeli Khabar
Home » टाटा आयपीएल – गुजरात टायटन्स १२ अंकांसह क्रमांक १ वर विराजमान
खेल

टाटा आयपीएल – गुजरात टायटन्स १२ अंकांसह क्रमांक १ वर विराजमान

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा पस्तीसवा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला. गुजरात टायटन्सने ८ धावांनी सामना जिंकला. गुजरात टायटन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. गुजरात टायटन्सकडून सर्वाधिक धावा कर्णधार हार्दिक पांड्याने ४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ४९ चेंडूंत ६७ धावा काढल्या. त्याला टीम साऊदीने बाद केले. डेव्हिड मिलरने २७ धावा काढल्या. त्याला शिवम मावीने बाद केले. वृद्धिमान सहाने २५ धावा काढल्या. त्याला उमेश यादवने बाद केले. राहुल तेवटियाने १७ धावा काढल्या. त्याला आंद्रे रसेलने बाद केले. बाकीच्या फलंदाजांनी विशेष योगदान न दिल्यामुळे. गुजरात टायटन्स १५६/९ इतकीच मजल गाठू शकले. आंद्रे रसेलने सामन्यात एकच षटक टाकलं. त्यात त्याने पहिल्या, दुसर्‍या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूंवर गुजरातला हादरे दिले. त्यांचं गोलंदाजी पृथक्करण १-०-५-४, टीम साऊदीने ४-०-२४-३, उमेश यादवने ४-०-३१-१, शिवम मावीने ४-०-३६-१ यांनी गडी बाद केले.

कोलकाता नाईट रायडर्सकडून सर्वाधिक धावा आंद्रे रसेलने एक चौकार आणि ६ षटकारांच्या सहाय्याने केवळ २५ चेंडूंत ४८ धावा काढल्या. त्याला अल्झारी जोसेफने बाद केले. रिंकू सिंगने ४ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने २८ चेंडूंत ३५ धावा काढल्या. त्याला यश दयालने बाद केले. व्यंकटेश अय्यरने १७ धावा काढल्या. त्याला रशिद खानने बाद केले. उमेश यादवने बिनबाद १५ धावा काढल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने केवळ १२ धावा काढल्या. त्याला यश दयालने बाद केले. महंमद सामीने ४-०-२०-२ त्याने दोन्ही प्रारंभिक फलंदाज पहिल्या दोन षटकांत बाद केले होते, रशिद खानने ४-०-२२-२, यश दयालने ४-०-४२-२, अल्झारी जोसेफने ४-०-३१-१, लॉकी फर्ग्युसनने ४-०-३३-१ गुजरातच्या पाचही गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख पार पाडली. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स १४८/८ इतकीच मजल गाठू शकला आणि गुजरातने ८ धावांनी विजय प्राप्त केला.
रशिद खानला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने २२ धावांत २ गडी बाद केले होते.

Related posts

राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत राघव, मुझफ्फर, यश यांची प्रेक्षणीय कामगिरी

Bundeli Khabar

एक नया और रोमांचक खेल ‘हानेटबॉल 360’ का भारत में आगाज़

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – लखनौ सुपर जायंट्सचा जायंट विजय

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!