सोनाळे ग्रुप ग्रामपंचायतिच्या सरपंच पदी शिवसेनेच्या मनिषा मोरे यांची बिनविरोध निवड
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रुप ग्रामपंचायतिच्या तत्कालीन सरपंच सौ. मिनल सुनिल हरड यांना दिलेला कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी स्वखुशीने आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदा करिता शुक्रवार दि. ११/३/२०२२ रोजी अध्यासी अधिकारी तथा भिवंडी पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री.सुधाकर सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्राम विकास अधिकारी श्री. अनिल दांडकर यांच्या खास उपस्थितीत सरपंच पदाची निवडणूक ग्रुप ग्रामपंचायत सोनाळे कार्यालयात घेण्यात आली सरपंच पदासाठी सौ. मनिषा तानाजी मोरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने सौ. मनिषा मोरे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी आधिकारी श्री.सुधाकर सोनावणे यांनी जाहीर केले. त्यांच्या निवडीची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत ढोल-ताशांच्या गजरात नवनिर्वाचित सरपंच यांचे जंगी स्वागत केले. यावेळी त्यांना शुभ आशीर्वाद व अभिनंदन शुभेच्छा देण्यासाठी
भिवंडी पुर्वचे माजी आमदार श्री.रुपेश दादा म्हात्रे, देवा ग्रुप फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री.सुजित उर्फ पप्या ढोले,उपाध्यक्ष श्री.संदिप ठाकरे, श्री.प्रकाश तेलिवरे (सभापती समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद ठाणे), भिवंडी पंचायत समिती सदस्य श्री.गुरुनाथ जाधव,भाजपा युवा मोर्च्याचे तालुका अध्यक्ष श्री. निलेश गुरव, देवा ग्रुप फाउंडेशन चे सचिव श्री. तानाजी मोरे.
मावळत्या सरपंच सौ.मिनल सुनिल हरड,उपसरपंच श्री.अनंता वाकडे, ग्राम विकास अधिकारी श्री.अनिल दांडकर पोलीस पाटील श्री पंकज चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सोनाळे ग्रामपंचायत मध्ये ज्या सदस्यांला सर्वानुमते जो कार्यकाल दिला जातो त्यानंतर त्यांनी त्याला दिलेला कार्यकाल संपल्यानंतर स्वखुषीने राजीनामा देणे बंधन कारक आहे व यामुळे प्रत्येक जण आपला कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा देतो, त्यामुळे प्रत्येक सदस्याला सरपंच होण्याचा मान मिळतो त्याचप्रमाणे त्याला दिलेल्या कार्यकालात सर्वानुमते गावाच्या विकासासाठी कोणते ही काम असो ते पूर्ण होते, त्यामुळे या ग्रामपंचायतीचा प्रत्येक सदस्य हा सरपंच म्हणूनच काम पाहतो असे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. गावाचा विकास हाच माझा ध्यास या उक्तीप्रमाणे मी मागील पाच वर्ष आत्ता ५ वर्ष
ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करते व या कालावधीत मला दुसऱ्यांदा बिनविरोध सरपंच होण्याचा मान माझे सहकारी सदस्य मावळत्या सरपंच सौ.मिनल सुनिल हरड,उपसरपंच श्री.अनंता सखाराम वाकडे, श्री संजय हनुमान थळे, सौ.माया तरे, सौ.जोस्ना किरकिरे, श्री रविंद्र गुळवी,सौ.प्रमिला संजय मढवी सौ.वैजंयती कुवर, श्री.मोहन मसणे, सौ.रुपाली जितेन्द्र मानेरकर सौ.करिष्मा वाकडे, श्री.अक्षय पाटील यांनी दिल्यामुळे मी या सर्वांचे मनापासून आभार मानते त्याचप्रमाणे माझे मतदार बांधव व उपस्थित सर्व ग्रामस्थ यांचे आभार मानते मी आत्ता सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्व सदस्यांच्या सहमतीने गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील असणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सौ मनीषा तानाजी मोरे यांनी यावेळी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना सांगितले.
विशेष म्हणजे तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या सोनाळे ग्रामपंचायत क्षेत्रात ४ महसुली गावे ,१४ पाड्यांचा समावेश असून १३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतिची मागच्या जनगणने नुसार ४६९० लोकसंख्या आहे. असेही त्यांनी शेवटी सांगितले.
देवा ग्रुप फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे सचिव डॉ.श्री.तानाजी मोरे यांनी माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाळे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकविला आहे.