23.3 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » भारतीयांना सहकार्य करणारा राष्ट्रपती सन्मानित पडद्यामागील राजदूत गिरीश पंत!
देश

भारतीयांना सहकार्य करणारा राष्ट्रपती सन्मानित पडद्यामागील राजदूत गिरीश पंत!

दिल्ली : पिथोरागड उत्तराखंड च्या बडीनाग बरसायत गावातील मूळ रहिवासी असलेले श्री गिरीश पंत दिल्लीला राहत असतानाच त्यांना व्यवसायाच्या माध्यमातून दुबई येथे जाण्याचा योग आला, व त्यामधूनच त्यांना दुबईचे राजदूत म्हणून काम करण्याची संधी मिळाली, दुबईत काम करत असताना त्यांचा अनेक देशांशी संपर्क आला त्यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश ,इंडोनेशिया, फिलिपिन्स, श्रीलंका, जर्मनी, रुस, रशिया, युक्रेन यांचा समावेश आहे, त्यामुळे भारतीय नागरिकांना कोणत्या देशात काय अडचणी आहेत याची सखोल माहिती श्री गिरीश पंत यांनी घेऊन त्यांनी आपल्या मायदेशी बांधवांना कशाप्रकारे मदत करता येईल याचा अभ्यास केला त्यानुसार त्यांनी आपल्या देशातील बांधवांना मायदेशी सुखरूप परतविण्याचे काम सुरू केले, त्यामुळे आत्तापर्यंत त्यांनी जवळ जवळ हजारो नागरिकांना सहकार्य करून मायदेशी आणले आहे, श्री गिरीश पंत हे जरी दुबईचे राजदूत असले तरी त्यांनी आपल्या भारतीयांना आलेल्या अडचणींना सामोरे जाऊन त्यांच्या अडचणी दूर केल्या आहेत त्यामुळे त्यांना अनेक देशातुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे, दुबईत काम करत असताना देखील दुसऱ्या देशात असलेल्या भारतीयांना मदत करण्याचे काम सामाजिक बांधिलकी म्हणून ते करत असतात,२०१९ मधे कोरोना चा वाढता प्रादुर्भाव असतानादेखील ते डगमगले नाही त्यांनी आपल्या देशासाठी प्राण पणाला लावून समाजहिताचे काम आपण भारतीय असल्याचा अभिमान म्हणून केले त्यामुळे भारत सरकारचे राष्ट्रपती महामाहिम रामनाथ कोविंद यांनी त्यांचा प्रवासी भारतीय सन्मान हा पुरस्कार देऊन सन्मान केला ही आपणा सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे, अशा या कर्तुत्ववान व्यक्तीला मानाचा मुजरा!

सध्या रशिया व युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे त्यामुळे भारतातील हजारो विद्यार्थी / नागरिक या दोन्ही देशात अडकले आहेत व या विद्यार्थ्यांना/ नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी श्री गिरीश पंत हे अहोरात्र मेहनत घेत आहेत त्यांनी जवळ जवळ आत्तापर्यंत तीन हजार विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे काम त्यांचे दिल्ली येथील सहकारी श्री कपिल जी मेहता यांच्या सहकार्याने पडद्यामागून केले आहे, त्यांच्या या धाडसी नेतृत्वाला भारतीय नागरिकांकडून मानाचा मुजरा,,,, असेच कार्य आपल्या हातून सदैव घडावे याच दैनिक स्वराज्य तोरण महाराष्ट्र राज्य, बुंदेली खबर व समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा….

Related posts

अभिनेत्री शिल्पा शेट्टी के पति राज कुंद्रा को14 दिन रहना पड़ेगा जेल में

Bundeli Khabar

मुख्य्य्मंत्री तीर्थ दर्शन ट्रेन को हरी झंडी

Bundeli Khabar

आतंक के रास्ते से सत्ता हासिल करने की कोशिश

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!