28.9 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » ठाणे भारत स्काऊट गाईड कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न .
महाराष्ट्र

ठाणे भारत स्काऊट गाईड कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून महिलांनी समाजाच्या विकासासाठी आत्मनिर्भर व्हावे.
संगीता शिंपी यांचे प्रतिपादन.

ठाणे : दिनांक 8 मार्च 2022रोजी जिल्हा स्काउट्स अँड गाईड्स कार्यालय ठाणे येथे ठाणे जिल्हा माध्यमिक उपशिक्षणाधिकारी श्रीमती ललिता दहिदुले यांच्या अध्यक्षतेखाली, अंगणवाडी सुपरवायझर श्रीमती संगीता शिंपी, शिक्षण विस्तार वर्षा सोनटक्के, महिला आर एसपी अधिकारी रेखा प्रभू गायत्री सपकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन स्काऊट गाईड आयुक्त श्रीमती संगीता रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या कार्यक्रम करिता श्रीमती ललिता दहितुले मॅडम उपशिक्षणाधिकारी जि प ठाणे, श्रीमती वर्षा सोनटक्के विस्तार अधिकारी जि प ठाणे, Dr तृप्ती सोनवणे प्राध्यापिका ठाणं कॉलेज, श्रीमती गायत्री सपकाळे, श्रीमती रेखा प्रभू RSP महिला अधिकारी, श्रीमती ,संगिता शिंपी महिला बालविकास अधिकारी घाटकोपर, श्रीमती प्राची जगताप फिजियोथेरपिस्ट, श्रीमती साधना जोशी लेखिका, श्रीमती पुष्पलता पाटील मुखध्यपिका नवी मुंबई मनपा शाळा क्रमांक35 कोपरखैरणे, इत्यादी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्तिथीती होत्या कार्यक्रमाच्या प्रमूख अध्यक्ष श्रीमती दहितुले यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला लॉर्ड आणि लेडी बेडन पावेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले तसेच इतर पाहुण्याच्या उपस्तिथीत दीप प्रज्वलन करण्यात आले पाहुण्यांचे स्वागत “या कुंदे ” या स्वागत गीताने गीताचे गायन श्रीमती शैलजा औटी (एल टी गाईड) श्रीमती संध्या निकम पाहुण्या आणि महिला चे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती संगिता रामटेके जिल्हा संघटक ठाणे यांनी केले. उपशिक्षणाधिकारी श्रीमती दहितुले यांनी स्काऊट गाईड शिक्षणाबाबत मनोगत व्यक्त केले तसेच मुलींमध्ये आरोग्य शिक्षण व नागरी संरक्षण याविषयी माहिती होणे गरजेचे आहे. महिलांनी स्वकर्तुत्वाने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण करण्यासाठी जिद्दीने पुढे यावे असे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाचा प्रमुख मार्गदर्शक श्रीमती साधना जोशी यांनी महिलांच्या अस्तिव, जाणीव अधिकार,समाजातील महिला बाबत दृष्टिकोन ज्ञान बाबत सखोल मार्गदर्शन केले. क्षेत्रातील महिला अधिकारी आणि माझे समाज कुटूंब माझी जबाबदारी याबाबत अनुभवाचे मार्गदर्शन केले. महिला बाल विकास विभागातील सुपरवायझर श्रीमती संगीता शिंपी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन बालविकास क्षेत्रातील महिलांचा विविध योजनांच्या उपक्रमांची माहिती व अंगणवाडी केंद्रामार्फत किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत मार्गदर्शनपर विविध योजनांबद्दल माहिती दिली. लहान वयातील मुलींमधील कुपोषित पणा कमी करण्यासाठी योग्य पोषण आहाराविषयी माहिती दिली. डॉ.प्राची यांनी महिलांचे आरोग्य, covid 19 आजार पासून स्वसंरक्षण, स्वच्छते बाबत माहिती श्वसनक्रिया बाबत प्रात्यक्षिक रित्या मार्गदर्शन केले, तसेच श्रीमती पुष्पलता पाटील यांचा ठाणे भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय वतीने सेवा निवृत्ती बाबत सत्कार करण्यात आला. महिला आर एस पी अधिकारी रेखा प्रभू व गायत्री सपकाळे यांनी प्रत्येक महिला भगिनीने आपल्या घरातून वाहतुकीचे नियम अमलात आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. या कार्यक्रमात प्रत्येक क्षेत्रातील महिलांची उपस्थिती होती. जागतिक महिला दिन निमित्त आलेल्या सर्व उपस्थित महिलांच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीमती अलमेडा ,मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी प्रधान ग्रीन इंग्लिश स्कूल डोंबिवली,श्रीमती दीपाली पाटील आदिवासी आश्रम शाळा भिनार ,श्रीमती श्रध्दा सांगळे, विशेष उपस्तिथीती होती तसेच ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, नवीमुंबई मनपा शाळेतील शिक्षिका उपस्थीत होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती संध्या निकम मॅम यांनी केले ठाणे भारत स्काऊट गाईड कार्यलय वतीने उपस्थित महिलांना भेट वस्तू, दुपारचे भोजन अशी व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या स्वागताकरिता श्रीमती कोडपे , आर के अभंग विद्यालय उल्हासनगर गाईड कॅप्टन यांनी रांगोळी काढली.आणि कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती संगिता रामटेके जिल्हा संघटक, श्रीमती सोनाली राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित सर्व मान्यवरांचे ठाणे जिल्हा स्काऊट गाईड आयुक्त श्रीमती संगिता रामटेके मॅडम यांनी विशेष आभार मानले.

Related posts

टोस्का क्रिप्टो एकेडमी द्वारा क्रिप्टो करेंसी के बारे में लोगों को मिली महत्वपूर्ण जानकारी

Bundeli Khabar

ब,जे आणि ई प्रभागात अनधिकृतपणे लावलेल्या बॅनर्स पोस्टर्स वर निष्कासनाची धडक कारवाई

Bundeli Khabar

द प्राइड ऑफ नेशन अवार्ड्स और इंडियन अचीवर्स अवार्ड 2023

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!