22.7 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20211229 WA0005
महाराष्ट्र

ब,जे आणि ई प्रभागात अनधिकृतपणे लावलेल्या बॅनर्स पोस्टर्स वर निष्कासनाची धडक कारवाई

Bundelikhabar

प्रमोद कुमार

कल्याण :- महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार कायापालट अभियाना अंतर्गत आज 2/ब प्रभागात सहा. आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी आपल्या कर्मचारी वर्गासह निक्की नगर वायलेनगर, खडकपाडा, वसंतव्हॅली या ठिकाणी लावलेले 30 अनाधिकृतपणे लावलेले बॅनर्स, पोस्टर्स निष्कासित करण्याची धडक कारवाई केली. महापालिकेच्या 4/जे प्रभागातही सहा.आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आज पुनालिंक रोड, तिसगाव, पत्रीपूल, टाटा पॉवर परिसरातील 22 बॅनर्स होर्डिग्ज आणि 12 झेंडे निष्कासित करण्याची कारवाई केली. 10/ई प्रभागातही सहा.आयुक्त भरत पवार यांनी कल्याण शिळ मार्गावरील 35 मोठे व 60 लहान बॅनर्स, होर्डिग्ज निष्कासित करण्याची कारवाई केली. सदर कारवाई या पुढेही सुरु राहणार आहे.


Bundelikhabar

Related posts

सिमेंट कॉन्क्रीटीकरणावर पडवळांचे लक्ष

Bundeli Khabar

पीआरएसआय – मुंबई चॅप्टरची’ नवीन कार्यकारणी जाहीर

Bundeli Khabar

आमदार चौधरींची म्हाडामध्ये बैठक

Bundeli Khabar
error: Content is protected !!