42.2 C
Madhya Pradesh
May 20, 2024
Bundeli Khabar
Home » आरोग्य समस्या व निराकरण या विषयावर चर्चासत्र
महाराष्ट्र

आरोग्य समस्या व निराकरण या विषयावर चर्चासत्र

शिंपी समाज महिला मंडळाचा वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे आरोग्य समस्या व निराकरण या विषयावर चर्चासत्र
स्वतः बनूनि सहाण, संसारात ओतते पंचप्राण’, डॉ. पल्लवी बारटके
महिलांनी आरोग्याची काळजी घेत आदर्श समाजात घडविण्यासाठी प्रयत्न करावेत: सुमन ताई ब्राह्मणकर यांचे प्रतिपादन

ठाणे : अ.भा.शिपी समाज मध्यवर्ती संस्थेच्या माजी महिला अध्यक्ष सुमनताई ब्राम्हणकर यांच्या पुढाकाराने, दिनांक ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘महिला आरोग्य समस्या व निराकारण’ या विषयावर डॉ.पल्लवी बारटके, अबुधाबी, संयुक्त अरब अमिरात, यांचे आँनलाईन वेबीनार ठेवण्यात आले होते. ‘स्वतः बनूनि सहाण, संसारात ओतते पंचप्राण’, या ओळींचा दाखला देत डॉ. पल्लवी बारटके यांनी स्त्री आरोग्यावर खूप उपयुक्त माहिती सांगितली. तसेच स्त्रिया कुटुंबाचा कणा असतात त्यामुळे त्यांनी स्वतःला सुदृढ राखणे खूप आवश्यक आहे यावर भर दिला व उपस्थित भगिनींच्या शंकांचे निरसन केले. श्रीमती सुमनताई ब्राह्मणकर यांनी स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपल्यातील सुप्त गुणांना वाव देत, आपल्या कर्तृत्वाने आदर्श समाज घडवण्यास मदत केली पाहिजे असे प्रतिपादन केले.आणि उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

Related posts

अज्ञानता, मनोविकार और दुर्गुणों से मुक्त होना ही सच्ची शिवरात्री मनाना है – भगवान भाई

Bundeli Khabar

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कटिबद्ध राहिल्यामुळे या शिक्षण संस्था उभारल्या गेल्या- विजय जाधव

Bundeli Khabar

आईजी इंटरनेशनल ने पीडब्ल्यूसी की सहायता से ईएसजी कार्यक्रम पर दिया ज़ोर

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!