38.5 C
Madhya Pradesh
May 5, 2024
Bundeli Khabar
Home » महिलांचे सक्षमीकरण हेच आमचे धोरण – तनुजा घोलप
महाराष्ट्र

महिलांचे सक्षमीकरण हेच आमचे धोरण – तनुजा घोलप

जागतिक महिला दिनानिमित्त समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने नाशिक येथे
आरोग्य क्षेत्रातील माहिलांचा सन्मान!

नाशिक : समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष
डॉ.श्री.सोन्या काशिनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण न्यासाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.तनुजा ताई घोलप यांनी जागतिक महिला दिनानिमित्त समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने नाशिक मधील लहवित व जातेगाव या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी व आशा सेविका यांचा यथोचित सत्कार करून सन्मानपत्र व साडी भेट देऊन गौरविण्यात आले, या प्रसंगी समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा,तथा समाजसेविका सौ. तनुजा ताई घोलप, पिंपळद सरपंच सौ.अलका झोंबाड, राहुरी सरपंच सौ.संगीता घुगे, लहवित सरपंच सौ.लोहरे, वंजारवाडी सरपंच श्री. ज्ञानेश्वर शिंदे आणि सदस्य म्हसले, दोनवाडे सरपंच शिरोळे तसेच सौ.जयश्री गोडसे, सौ.शोभा पाटील, सौ.हर्षदा चव्हाण, सौ.कांचन बेझेकर, सौ.वैष्णवी शिरसाठ, श्री. तानाजी आरोटे, श्री.अनिल कड, श्री. संतोष बिन्नर, श्री. संदीप हगवणे आदी मान्यवर व मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होत्या.

जेव्हापासून समाज कल्याण न्यास या संस्थेशी मी जोडली गेली आहे तेव्हापासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी संस्थापक अध्यक्ष सोन्या दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे ,महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन त्यांच्या उदरनिर्वाहासाठी प्रयत्न सुरू आहेत, काही ठिकाणी महिलांना आम्ही छोटे खाणी व्यवसाय सुरू करून दिले आहेत, अशाप्रकारे सध्या आमचे कार्य सुरू असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सौ.तनुजा ताई घोलप यांनी दैनिक स्वराज्य दोन शी बोलताना सांगितले. तसेच कोरोना काळात आमच्या आरोग्य विभागातील महिलांनी जिवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन जे काम केले त्याची पोचपावती म्हणून आम्ही आज महिला दिनाचे औचित्य साधून त्यांचा सन्मान केला. असेही त्यांनी शेवटी सांगितले.

Related posts

ग्रंथप्रेमींसाठी १६ नोव्हेंबरपासून दादरमध्ये ‘ मुंबई शहर ग्रंथोत्सव”

Bundeli Khabar

गायों की हो रही मौत पर संग्राम सिंह ने 11 मोबाइल एम्बुलेंसस सुविधाओ को दी हरी झंडी

Bundeli Khabar

‘अमृत बाणी’ श्री गुरु ग्रंथ साहिब जी का संपूर्ण संग्रह

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!