25.5 C
Madhya Pradesh
August 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20220309 WA0011
महाराष्ट्र

सेंद्रिय पद्धतीने भाज्या पिकवल्या तर स्वतःच आरोग्य आणि कुटुंबाचे आरोग्य चांगले राखू शकते- डॉ.संगिता तोडमल

Bundelikhabar

अमेरिका : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने रोग मुक्त भारत अभियान व आंतरराष्ट्रीय महिला दिवस याचे औचित्य साधून इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्था आणि आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या तर्फे अंतरराष्ट्रीय महिला आरोग्य परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.
महिलांनी किचन गार्डन मधून किंवा आपल्या परसबागेत सेंद्रिय पद्धतीने भाज्या पिकवल्या तर स्वतःचा आपल आरोग्य आणि कुटुंबाचे आरोग्य चांगले राखू शकते आणि रोग मुक्त भारत करण्यास मदत करू शकते.
असे आवाहन डॉक्टर संगीता तोडमल यांनी आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य परिषद यामध्ये केले. यावेळी बोलताना पुढे त्या म्हणाल्या की आपणच आपला भाजीपाला पिकवला तर आपण खर्चाची सुद्धा बचत करू शकतो तसेच परस बागेत काम करताना स्वतःचाही चांगला व्यायाम होतो त्यामुळे व्यायाम आणि आहार या दोन्ही गोष्टींची काळजी यामधून घेतली जाते, अमेरिकेमध्ये सहा महिने हिवाळा असतो खूप बर्फ पडते आणि अशा वातावरणातही त्यांनी आपलं किचन गार्डन हिवाळ्यामध्ये कुंडीत ठेवून घरात जपलेला आहे ,उन्हाळा आल्यानंतर त्या कुंड्या बाहेर ठेवतात.
निसर्गाशी जुळवून घेत त्या आपली परसबाग जपत आहेत,

कचरा व्यवस्थापन सेंद्रिय खत तेही त्या स्वतः करतात अमेरिकेतील अनेक सामाजिक संस्थांबरोबर त्यांच्या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण विषयक चळवळ सुरू केलेली आहे.
वरील भाग पालेभाज्या फळभाज्या किंवा टेरेस गार्डन परसबाग आशा विविध विषयांवर महिला बचत गट हाउसिंग सोसायटी यामध्ये त्या अनेक वर्ष मोफत मार्गदर्शन करतात,
तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वेगवेगळे शाळा कॉलेजेस मधील विद्यार्थ्यांना ही त्या ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या विषयात मार्गदर्शन करतात करोना काळातही त्यांनी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करून एक अनोखा उपक्रम केला
भारताबरोबरच त्या वेगवेगळ्या पर्यावरण विषयक चर्चासत्रात सहभागी होतात त्यांनी जगभरातील अनेक देशातील पर्यावरण विषयक प्रश्नांवर अभ्यास केलेला आहे, अमेरिकेतील जिम मध्ये मोफत योग आणि प्राणायाम शिकवतात तसेच भारतीय जीवन शैली आणि संस्कृती यांचा प्रचार आणि प्रसार करतात.
या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर इतर राज्यातही शाळा कॉलेजेस आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्था यामध्ये पर्यावरण विषयक व्याख्याने देऊन पर्यावरण संवर्धनाची एक पिढी घडवत आहेत,
तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती याचे अमेरिकेत पालन करत आहेत,
आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमात तसेच विविध सण उत्सवात सहभाग घेऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने रोग मुक्त भारत अभियान व आंतरराष्ट्रीय महिला दिवस याचे औचित्य साधून इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्था आणि आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या तर्फे अंतरराष्ट्रीय महिला आरोग्य परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. परिषद तीन दिवस चालली होती.

यामध्ये महिलांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यविषयक चर्चा करण्यात आली आणि महिलांच्या वेगळ्या गोष्टींबाबत परामर्श करण्यात आला.
याप्रसंगी दीपप्रज्वलन छत्तीसगडच्या राज्यपाल यांनी केले
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक चे आय एन ओ चे अध्यक्ष अनंत बिरादार यांनी केले या कार्यक्रमासाठी सहभागी झालेल्या महिलांचे डॉ सलीला तिवारी यांनी आभार मानले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता नेहरा यांनी केले त्रिभुवन सर यांनी तांत्रिक सहकार्य केले या आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये जगभरातून प्रतिनिधी ऑनलाइन पद्धतीने हजर होते.


Bundelikhabar

Related posts

‘स्त्री कर्तव्य सम्मान समारोह’ कार्यक्रम संपन्न

Bundeli Khabar

टिटवाळा येथे सात वर्षीय चिमुकलीवर सावत्र बापाचा बलात्कार*

Bundeli Khabar

गौरीशंकर चौबे का सम्मान समारोह संपन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!