31.9 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » शवविच्छेदन कक्ष २४ तास सेवा देणार
महाराष्ट्र

शवविच्छेदन कक्ष २४ तास सेवा देणार

शवविच्छेदन कक्ष २४ तास सेवा देणार, शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवडी विधानसभेतील परळ विभागात जगप्रसिद्ध के. ई. एम. रूग्णालय आहे. देशभरातून दररोज हजारोंच्या संख्येने रूग्ण येथे दाखल होतात. सदर रूग्णालयात रुग्णाचे निधन झाल्यानंतर त्याचे मुख्य कारण तपासण्यासाठी त्या शवाचे विच्छेदन करण्यात येते. या शवविच्छेदन कक्षाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत असते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना पुढील विधी करण्यासाठी विलंब होतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ आणि अनिल कोकिळ यांनी महानगरपालिका प्रशासनाला शवविच्छेदन कक्ष २४ तास चालू ठेवण्याची विनंती करणारे पत्र लिहिले होते. यासंदर्भात के. ई. एम. रुग्णालयाच्या डीन डॉ. संगीता रावत यांच्या दालनात या मुख्य विषयावर बैठक घेण्यात आली.

या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, वैदयकीय कायदेशीर शवांसाठी वेळ दररोज सकाळी ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत असेल. तसेच सर्वसाधारण आजाराने मृत्यू झाला असल्यास कक्ष १ एप्रिल २०२२ पासून संपूर्ण दिवसभर सुरू करण्यात येईल.

या बैठकीत के. ई. एम. शवागारातील पायाभूत सुविधांच्या सुधारणा करणे तसेच के. ई. एम. शवागरामधील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे या विषयावर देखील चर्चा करण्यात आली. सदर बैठकीस के. ई. एम. रूग्णालयाच्या डाॅ. संगीता रावत अधिष्ठाता, डाॅ. रविंद्र देवकर प्राध्यापक अतिरिक्त व विभाग प्रमुख प्र. न्याय वैद्यकशास्त्र विभाग, डाॅ. दक्षा प्रभात विभाग प्रमुख विकृती शास्त्र विभाग, शवविच्छेदन विभाग डाॅ. गिरीश तासगांवकर व डाॅ. रचना चतुर्वेदी, शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ, अनिल कोकिळ तसेच देवानंद कदम व बाळा मुगदार उपस्थित होते.

Related posts

रक्षाबंधनानिमित्त ट्रेलचा ‘ट्रेलसिबलिंगस्वॅग’ उपक्रम,भावा-बहिणीमधील प्रेमाचे नाते करणार साजरे

Bundeli Khabar

ठाणे के अतिरिक्त पुलिस आयुक्त बने रामनाथ पोक

Bundeli Khabar

यंदाही ठाणे महापालिकेची फिरती विसर्जन व्यवस्था,महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांची माहिती

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!