30 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20220212 WA0010
महाराष्ट्र

राज्य नाट्य स्पर्धा २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार – अमित देशमुख

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित करण्यात येणारी राज्य नाट्य स्पर्धा, २१ फेब्रुवारी २०२२ पासून राज्यातील १९ केंद्रांवर सुरू होईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज केली. ओमिक्रॉन आणि कोवीड-१९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, १५ जानेवारी पासून सुरू होणारी राज्य नाट्य स्पर्धा पुढे ढकलली गेली होती.

सद्यपरिस्थितीचा आढावा घेऊन हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरुवात २१ फेब्रुवारी पासून, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धा ५ मार्च पासून तर बालनाट्य स्पर्धा १० मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांनी दिली आहे.

या निमित्ताने सहभागी स्पर्धक संघ व कलाकारांचे अभिनंदन करून सर्व सहभागी संघांनी कोवीड-१९ विषाणू प्रादूर्भाव संदर्भात शासनाने वेळोवळी निर्गमित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करुन स्पर्धेतील प्रयोगाचे सादरीकरण करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.


Bundelikhabar

Related posts

पत्रकारितेतील डॉक्टरेट मिळवुन देण्यासाठी महाराष्ट्राचे राजदूत डॉ.मणिलाल शिंपी यांचे योगदान महत्वाचे :डॉ.किशोर पाटील

Bundeli Khabar

दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना मोफत युनिवर्सल पास (स्मार्ट कार्ड) चे मोफत वाटप

Bundeli Khabar

आमदार मोहन मते यांच्या उपस्थितीमध्ये घरगुती गणेश दर्शन सजावट स्पर्धेचे बक्षिस वितरण

Bundeli Khabar
error: Content is protected !!