23.6 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20210818 WA0019
महाराष्ट्र

जिंदाल कंपनी विरोधात ग्रा.पं.सदस्यांचे आमरण उपोषण

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
वासिंद : वासिंद येथे असलेल्या जेएसडब्लयु(जिंदाल) कंपनीच्या असलेल्या कलर प्लॅन्ट विरोधात अनेकदा लेखी तक्रार करुनही कुठलीच कारवाई अथवा चौकशी करण्यात आलेली नसल्याने याबाबत येत्या सोमवारी 23 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्या प्रेरणा गायकवाड यांनी शहापूर तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या कडे दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे।


सदर ग्रामपंचायतीच्या यापूर्वी झालेल्या मासिक सभेमध्ये कंपनीमध्ये स्थानिक भुमीपूत्रांना रोजगार देण्यात यावा असा ठराव करण्यात आला होता.त्या ठरावाला सुध्दा कंपनी व्यवस्थापनाने केराची टोपली दाखवली आहे. लेखी देऊन व निर्देशनास आणूनही कंपनी व्यवस्थापन या मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे म्हटले आहे।


दरम्यान, कंपनीचे हे धोरण आडमुठीचे असून या कंपनी विरोधात येत्या 23 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे।


Bundelikhabar

Related posts

प्राणियों की हत्या के विरोध में निकली पदयात्रा

Bundeli Khabar

महाराष्ट्रा अनलाॅक आम लोगों के लिए जल्द लोकल ट्रेन में सफर करने पर फैसला

Bundeli Khabar

सेवानिवृत्त लेफ्टिनेंट जनरल सैयद अता हसनैन ने की ‘शेरशाह’ की तारीफ़

Bundeli Khabar
error: Content is protected !!