26.3 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20220112 WA0010
महाराष्ट्र

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कटिबद्ध राहिल्यामुळे या शिक्षण संस्था उभारल्या गेल्या- विजय जाधव

Bundelikhabar

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कटिबद्ध राहिल्यामुळे या शिक्षण संस्था उभारल्या गेल्या- विजय जाधव
मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल महाविद्यालयात् जो सन्मान केला त्या सन्मानाचा मी सदैव ऋणी राहीन -डॉ.किशोर पाटील
आंतर महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न!
भिवंडी : पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचलित बी. एन. एन. महाविद्यालय भिवंडी व सांस्कृतिक भाषा वांड:मय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने

पद्मश्री अण्णासाहेब जाधव जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आंतर महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेचे आयोजन बी. एन. एन. महाविद्यालय भिवंडी येथे करण्यात् आले होते, सदर स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय पांडुरंग जाधव व दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले, यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाघ, उपप्राचार्या डॉ.के.एन.पाटणकर- जैन, को-ऑर्डिनेटर डॉ.श्री.एस्.आर. म्हाळूंणकर, डॉ.श्री. रवींद्र रसाळ, परीक्षक डॉ.श्री. प्रकाश मसराम इतिहास विभाग प्रमुख मुंबई विद्यापीठ, श्री. शिशिर बोधी परमाणु ऊर्जा केंद्रीय विद्यालय तारापूर ,डॉ.श्री. दिपक नायर समदिया महाविद्यालय भिवंडी, समन्वयक प्रा. पुंडलिक वारे, आदी मान्यवर, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी,व महाविद्यालयीन विद्यार्थी वर्ग उपस्थित होते,

कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक को-ऑर्डिनेटर डॉ.श्री.एस्.आर. म्हाळूंणकर यांनी केले.
अण्णासाहेब जाधव जन्मशताब्दी महोत्सवानिमित्ताने आज या ठिकाणी वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रथम अभिनंदन करतो, अण्णांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्ष झाले आहे, संस्थेचे चार महाविद्यालय आहेत व या ठिकाणी साधारण दरवर्षी ३५०० विद्यार्थी शिक्षण घेतात, माध्यमिक शाळा २२ आहेत व आश्रम शाळा सोडून १४ वस्तीग्रह आहेत, आज भिवंडी महाविद्यालयात १२५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तसेच संस्थेमध्ये सर्व विद्यार्थी पकडले तर २६५००,
विद्यार्थी दरवर्षी आपल्या संस्थेच्या माध्यमातून शिकतात, अण्णा साहेबांनी जर हे वटवृक्ष लावली नसती तर आज भिवंडी सह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील मागासवर्गीय समाज शिक्षणापासून वंचित राहिला असता म्हणून अण्णांनी या शिक्षण संस्थेची स्थापना केली व त्यामुळे आज हजारो लाखो विद्यार्थी या संस्थेतून शिकले गेले, अण्णा मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कटिबद्ध राहिल्यामुळे शिक्षणगर् संस्था उभारल्या गेल्या आहेत ग अध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले.

सर्वप्रथम मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो व उपस्थित स्पर्धकांचे अभिनंदन करतो आज योगायोग म्हणून मला गुरुजींच्या सोबत प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयात येण्याचा बहुमान मिळाला, तसेच पत्रकार क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सन्माननीय भगतसिंग कोशारी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आल्यामुळे माझा जो छोटे खाणी सन्मान महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला त्याबद्दल मी महाविद्यालयाचा सदैव ऋणी राहीन, सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगेन की, मी ही तुमच्यासारखाच एक विद्यार्थी म्हणून बाकावर बसनारा होतो, व आज प्रमुख पाहुणा म्हणून
तुमच्यासमोर उभा आहे त्यामुळे तुम्ही ही आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या अंगातील कलागुणांना वाव देऊन आपल्या महाविद्यालयाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात लौकिक करावे अशा मी शुभेच्छा देतो, असे मनोगत व्यक्त करताना दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा भिवंडी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. श्री .किशोर पाटील यांनी सांगितले, या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक पुंडलिक वारे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सुरेश भदरगे व प्रा.भीमराव पाईकराव यांनी केले, सदर स्पर्धेत एकूण १८ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन प्रा. शामराव सावंत, डॉ.सुरेश भदरगे, प्रा. भिमराव पाईकराव प्रा. भाऊसाहेब पगारे, डॉ. रोनक रईस प्रा, सुरेखा धेंडे , यांनी केले होते.


Bundelikhabar

Related posts

बीकेसी दुर्घटना के लिए जिम्मेदार अधिकारी और ठेकेदार पर दर्ज हो FIR

Bundeli Khabar

वडवली-अटाळीत रक्षाबंधन उत्साहात साजरा

Bundeli Khabar

शिक्षक तथा व्याख्याते स्वप्नील पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

Bundeli Khabar
error: Content is protected !!