21.6 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर मोगलप्‍पा कामूर्ती याला ५० लाख रुपये घेताना रंगेहात पकडले
महाराष्ट्र

भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर मोगलप्‍पा कामूर्ती याला ५० लाख रुपये घेताना रंगेहात पकडले

संदीप शेंडगे/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीतील पद्मा नगर भाजी मार्केट येथे तक्रारदार यांचे दुकान असून याच ठिकाणी इतर 100 दुकाने अनधिकृत असल्याची तक्रार काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केली होती
तक्रार मागे घेण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे दोन कोटी रुपये मागितले होते. तक्रारदार यांनी इतकी मोठी रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मुंबई येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली लाचलुचपत विभागाने सापळा रचून सिद्धेश्वर याला तडजोडी अंती ठरलेली पन्नास लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.

पद्मा नगर भाजी मार्केटमध्ये 100 अनधिकृत गाळे तयार होत असताना भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त आणि अनधिकृत बांधकाम उपायुक्त हे झोपा काढत होते काय असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. स्वीकृत नगरसेवकाला अटक झाली असून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार असा सवाल संतप्त नागरिक करीत आहेत.
अधिक अनधिकृत बांधकामांची तक्रार केल्यानंतरही अनधिकृत बांधकामावर कारवाई होत नसून केवळ तक्रार अर्ज मागे घेतल्यानंतर ते अनधिकृत बांधकाम अधिकृत होते काय तसे असेल तर तक्रार मागे घेतलेले सर्व अनधिकृत बांधकाम महानगरपालिका अधिकृत करणार आहे काय याचे आयुक्तांना उत्तर द्यावे लागेल स्वीकृत नगरसेवकावर कारवाई झालीच पाहिजे परंतु ज्या अधिकाऱ्यांमुळे अनधिकृत बांधकाम ांडत आहे अशा अधिकार्‍यांवर कधी कारवाई होणार असा सवाल या निमित्ताने पुढे आला आहे

Related posts

घर में सेंध लगाने वाले गिरोह के पांच लोगों को पुलिस ने किया गिरफ्तार

Bundeli Khabar

नीलोत्पल मृणाल की नन्ही गूंज विकास फाउंडेशन द्वारा आयोजित हुआ G20 मैराथन

Bundeli Khabar

राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!