39.3 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » स्प्रिंटर क्लब कोनगांव आयोजित अथेलेटिक स्पर्धा कोनगांव येथे मोठ्या उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

स्प्रिंटर क्लब कोनगांव आयोजित अथेलेटिक स्पर्धा कोनगांव येथे मोठ्या उत्साहात संपन्न

भिवंडी : स्प्रिंटर क्लब कोनगांव आयोजित अथेलेटिक ( मैदानी) स्पर्धा रविवार दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

या स्पर्धेत उरण,पनवेल,अंबरनाथ भिवंडी,कल्याण,डोंबिवली,उल्हासनगर,बदलापूर,ठाणे,अलिबाग अशा अनेक ठिकाणाहून ७०० ते ८०० स्पर्धकां नी सहभाग घेतला.लहान वयोगटापासून ते १८ वर्षेपर्यंत मुले,मुलींच्या मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या.सर्व क्रीडा प्रकारात प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक यांना पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.प्रमुख पाहुणे शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित सुरेशदादा पाटील,आंतरराष्ट्रीय धावपट्टू श्री.एकनाथ पाटील,पंचायत समिती सदस्या सौ.शिला नंदकुमार राखाडे,मा.सरपंच सौ.सविता प्रल्हाद राखाडे,कोकणरत्न प्रा.विनोद हनुमान पाटील कोनकर,ठाणे जिल्हा कबड्डी संघाचे उपाध्यक्ष श्री.संजय कराळे,क्रीडा शिक्षक श्री.राजेश कराळे,शैलेश पाटील,भूषण पाटील,जयेश भगत,सुनिल राखाडे,नंदकुमार राखाडे,विलास भावे,प्रमोद पारसी तसेच अनेक मान्यवर यांच्या हस्ते बक्षिस समारंभ करण्यात आले.मार्गदर्शक प्रा.श्रीराम पाटील आणि अफसर खान यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले.स्पर्धेचे आयोजक श्री.प्रल्हाद एकनाथ राखाडे,महेश कोळी,रुपेश पाटील,देशमुख आणि सहकारी यांनी उत्तम आयोजन केले.शिस्तबद्ध संघ म्हणून डी बी जाधव संघ,मुलींमध्ये राजे स्पोर्ट्स क्लब आणि मुलांमध्ये उरण अकॅडमी यांना प्रथम पारितोषिके देण्यात आले. जनरल चॅम्पियन शिप राजे स्पोर्ट्स क्लब यांना देण्यात आली.चॅम्पियन स्पोर्ट्स क्लब भिवंडीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मार्गदर्शक देविदास पाटील यांचा सन्मान करण्यात आला. कोनगावातील संघर्ष अकॅडमीच्या मुले आणि मुली यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मार्गदर्शक श्री.दुर्गेश पाटील आणि आशिष तरे यांचा सन्मान करण्यात आला.

Related posts

वसंतदादा पाटील शिक्षण संकुलात रोजगार मेळाव्याचे आयोजन

Bundeli Khabar

दोनों भाई बहन पिंपरी-चिंचवड़ और पुणेवासियों की सेवा के लिए तैयार

Bundeli Khabar

एमजी कार क्लब इंडिया और नरगिस दत्त फाउंडेशन की भागीदारी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!