28 C
Madhya Pradesh
April 27, 2024
Bundeli Khabar
Home » महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज आरोग्य शिबिराचे भिवंडी शहरातील गुरुकृपा हॉस्पिटल नारपोली येथे आयोजन
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज आरोग्य शिबिराचे भिवंडी शहरातील गुरुकृपा हॉस्पिटल नारपोली येथे आयोजन

भिवंडी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक आदरणीय श्री संजयजी भोकरे यांच्या आदेशानुसार पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. वसंतजी मुंडे व प्रदेश सरचिटणीस श्री. विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसा निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सप्ताह शिबिर घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्या अनुषंगाने कोकण विभागीय अध्यक्ष श्री.नितीन मनोहर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय सचिव डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांच्या वतीने व गुरुकृपा हॉस्पिटल चे डॉक्टर श्री अरुण पाटील यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन गुरुकृपा हॉस्पिटल नारपोली येथे करण्यात आले आहे. सदर शिबिर हे फक्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातील सदस्यांसाठीच आयोजित करण्यात आले आहे. याची सर्व पत्रकारांनी नोंद घ्यावी, सदर आरोग्य शिबिराचे उद्घाटन राज्यपाल सन्मानित महात्मा गांधी ग्लोबल पीस फाऊंडेशन भुवनेश्वर ओडिसा चे डायरेक्ट तथा महाराष्ट्र राज्याचे राजपूत (ब्रँड अँबेसिडर) तसेच कल्याण ठाणे युनिटचे आर एस पी कमांडर डॉ.श्री. मणिलाल रतिलाल शिंपी यांच्या शुभहस्ते दुपारी १२ वाजता होणार असून सदर शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक उप शाखा नारपोली अंजुरफाट्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर आव्हाड उपस्थित राहणार आहेत. सदर शिबिर हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

हे आरोग्य शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भिवंडी शहर महानगरपालिका क्षेत्र सद्स्य, श्री.सूरजपाल यादव, श्री.श्रीनिवास सिरीमल्ले, श्री.गुरुप्रसाद सिंग,श्री.सी. पी. तिवारी,
श्री.मेंहदी हसन मंसूरी,श्री.रेहान खान,
श्रीमती.परवीन खान,
श्री.वेंकटेश रापेल्ली,
श्री.ताज अंसारी,श्री.सोमनाथ ठाकरे, श्री.जगदीश पाताले,
श्री.लवलेश सुतार, श्री.एस बी अंसारी, श्री.अरुण मिश्रा,श्री.जितेन्द्र तिवारी,
सौं.नीलम तिवारी, सौं.रेश्मा अंसारी, श्री. प्रितेश पाटील,
श्री.केतन म्हात्रे, श्री.राज पाठक विशेष मेहनत घेत आहेत.

Related posts

तीन कृषी कायदे रद्द, काँग्रेसने साजरा केला पेढे वाटून विजय दिवस साजरा

Bundeli Khabar

राज्यपाल सन्मानित महाराष्ट्राचे ब्रँड अँबेसिडर डॉ. मनिलाल शिंपी यांना नागपूर येथे ” जीवन गौरव २०२१ ” पुरस्कार प्रदान

Bundeli Khabar

ठगी: लाखों का चूना लगाने वाला नटवरलाल गिरफ्तार

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!