28.2 C
Madhya Pradesh
September 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20220104 WA0008
महाराष्ट्र

वाडा तहसिल कार्यालयातील स्वच्छतागृहाची दुरावस्था. लाखों रूपये खर्च करूनसुद्धा स्वच्छतागृहामध्ये घाणीचे साम्राज्य

Bundelikhabar

वाडा / सत्यवान तरे सन 2016 – 17 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वाडा तहसिल कार्यालयात 14,94,574/- रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहाची अवस्था अतिशय वाईट असून, प्रसाधनगृहाच्या प्रवेशद्वारातच झाडे-झुडपे वाढली आहेत, प्रसाधनगृहामध्ये मुतारी व संडासचे पाणी तुंबल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

वाडा नगरपंचायतीने शहरात नागरिकांसाठी कुठेही सार्वजनिक मुतारी बांधलेली नसल्याने नागरिकांना एस.टी. स्टँडजवळील मुतारी, पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृह व तहसिल कार्यालयात लाखो रूपये खर्च करून बांधलेल्या स्वच्छतागृहाचा आधार घ्यावा लागतो त्यातच वाडा तहसिल कार्यालयात शासकीय कामाकरीता खेडयापाडयातून महिला, जेष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरूण, तरूणी व सर्वसामान्य नागरिकांची सततची वर्दळ असते. मात्र तहसिल कार्यालयातील लाखो रूपये खर्चुन नव्याने बांधलेल्या प्रसाधनगृहाच्या अस्वच्छतेमुळे सर्वांना एस.टी. स्टॅन्डजवळील मुतारीचा आधार घ्यावा लागतो. अगदी हाकेच्या अंतरावर वाडा तहसिलदार यांचे दालन आहे असे असतांना देखील प्रसाधनगृहाकडे कुठल्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लक्ष जात नाही. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा व दुर्लक्षामुळे या प्रसाधनगृहाची अवस्था अतिशय वाईट आहे. लाखों रूपये खर्च करूनसुद्धा स्वच्छतेअभावी व दुर्गंधीमुळे नागरिकांना या प्रसाधनगृहाचा वापर करण्यास अडचणी येत असल्याने या प्रसाधनगृहासाठी खर्च केलेले लाखों रूपये वाया गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.


Bundelikhabar

Related posts

60 साल के व्यक्ति की हत्या के मामले में महिला समेत 2 लोगों को किया गिरफ्तार

Bundeli Khabar

जुहू बीच को स्वच्छ बनाने के लिए सनटेक फाउंडेशन की मुहिम

Bundeli Khabar

सात्यकी सावरकर यांना विधानपरिषदेवर सदस्यत्व देण्याची राज्यपालांकडे मागणी

Bundeli Khabar
error: Content is protected !!