24.2 C
Madhya Pradesh
October 25, 2026
Bundeli Khabar
IMG 20220107 WA0001
महाराष्ट्र

उत्तम शिक्षणासोबत निरोगी विद्यार्थी हेच आमचे कर्तव्य…बिल.एन.पवार कॉलेज टिटवाळा

Bundelikhabar

केंट वेली इंटरनॅशनल शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लसीकरण….

टिटवाळा : शारदा फाउंडेशन संचालित केंट वेली इंटरनॅशनल स्कूल आणि बि.एन. पवार ज्युनियर कॉलेज टिटवाळा येथे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार 15 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना कोव्हॅक्शिन मात्रा पालकांच्या उपस्थितीत देण्यात आली.
कल्याण तालुक्यामध्ये टिटवाळा ग्रामीण भागात शारदा फाउंडेशन संचालित केंट व्हॅली इंटरनॅशनल स्कूल आणि बि. एन. पवार ज्युनियर कॉलेज येथे मान्यताप्राप्त सी बी एस सी, स्टेट आणि आय सी एस सी बोर्ड माध्यमातून उच्च प्रतीचे शिक्षण दिले जाते म्हणूनच अगदी नव्याने सुरू झालेल्या या शाळा-महाविद्यालयात अनेक पालकांनी आपल्या मुलांच्या सुंदर भवितव्याचा विचार करून प्रवेश घेतला आहे , गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा कॉलेज अनेक दिवस बंद ठेवावी लागली तरीही शालेय प्रशासनाच्या माध्यमातून उच्च दर्जाचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरु आहेच अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शाळा कॉलेज चालू होण्याची चिन्हे दिसत असताना कोरोना महामारी ओमायक्रोनसारखा नवा आजार पसरत असल्यामुळे शाळा प्रशासनाला नव्याने शासनाचे निर्बंध घालून द्यावे लागत आहेत. याच बरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशान्वये शाळा महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेल्या 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना कोव्हॅक्शिन मात्रा शाळेय प्रशासनाच्या माध्यमातून सरकारी आरोग्य विभागाच्या मार्फत मोफत देण्यात येत आहे. यामुळे आपल्या शालेय विद्यार्थ्यांची काळजी घेणे आपले परम कर्तव्य आहे याला अनुसरून शालेय प्रशासनाने प्रत्येक विद्यार्थी यांना पालकांच्या उपस्थितीत शासनाच्या नियमानुसार १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोव्हॅक्शिन मात्रा देण्यास सुरुवात केली .
या शाळा-महाविद्यालयात जवळ जवळ सोळाशे विद्यार्थी विद्यार्थिनी सी बी एस सी , स्टेट आणि आयसीएससी बोर्डाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत यामध्ये 16 ते 18 वयोगटातील जवळ जवळ 250 विद्यार्थ्यांना कोव्हॅक्शिन मात्रा जसजशी उपलब्ध होईल त्याप्रमाणे देण्यात येईल असे शालेय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.


Bundelikhabar

Related posts

जिल्हा अग्रणी बँक तर्फे जिल्ह्यात अलिबाग मध्ये महा कर्ज मेळावा

Bundeli Khabar

जन आशीर्वाद यात्रा’ के दौरान कार्यक्रम के आयोजकों के खिलाफ FIR दर्ज

Bundeli Khabar

डोंबिवली पूर्व देसले पाडा येथील तळ + 4 मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची धडक कारवाई

Bundeli Khabar
error: Content is protected !!