39.8 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » महाराष्ट्र राज्यात झिका अलर्ट
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यात झिका अलर्ट

महाराष्ट्र / भुषण प्र. कुंडईकर
डोंबिवली : महाराष्ट्र कोरोना “विषाणू” च्या विळख्यातून सुटत असताना आरोग्य व्यवस्थेपुढे एक मोठे आव्हान तोंड उघडून आ वासून उभे राहीले आहे. ते आव्हान म्हणजे ” झिका विषाणू ” .हा डास चावल्याने होणारा नविन सौम्य प्रकाराचा विषाणू आहे।


पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात ” झिका ” विषाणूचा पहिला महिला रूग्ण आढळला आहे. सदर ” झिका ” विषाणूची लागण झालेली महिला ५५ वर्षांची असून ती बरी झाली आहे तरी ह्या विषाणूची लागण अनेकांना झाल्याची शक्यता असल्याने बेलसर विभागातील ५ किलोमीटर च्या अंतरावर असलेल्या गावांना सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे।
सध्या हवामानात झालेल्या बदलामुळे ईतर साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. ह्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी बेलसर गावातील आरोग्य केंद्रास भेट देऊन त्या गावाची पाहणी केली व स्वत:ला डासांपासून दुर ठेवणे हा एकमेव उपाय ” झिका ” विषाणूचा धोका टाळू शकतो असे येथील गावकर्यांना सांगीतले.तसेच या विषाणूला कोणीही घाबरून न जाता योग्य ती काळजी घेतल्यास ” झिका ” विषाणू पासून आपण सुरक्षित राहू शकतो असे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात आले आहे।


तसेच सदर “झिका ” विषाणूचा धोका टाळण्यासाठी १) घरात स्वच्छता ठेवा. २)घरामध्ये व आजुबाजुच्या परिसरात पाणी जास्त साठू देऊ नका व पिण्याचे पाणी उघडे ठेवू नका. ३)मच्छरदाणीचा वापर करा. ४)घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना मच्छरविरोधी जाळ्यांच्या लावा. ५)झिका विषाणू एक डास एकाला चावल्यानंतर दुसर्याला चावल्याने होतो .६)हा आजार संसर्गजन्य नाही. ७)या विषाणूचा धोका महिलांसाठी जास्त आहे. ८)तुम्हाला डायबीटीस, हायपर टेंन्शन, व काही गंभीर आजार असतील तर प्रवास करण्या आधी डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. ९)प्रवास करून आल्यावर दोन दिवस ताप राहिल्यास तात्काळ डाॅक्टरांशी संपर्क करून आपली तपासणी करावी।

Related posts

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क प्रभाग क्षेत्रातील जीन्स पॅन्टच्या कारखान्यांवर निष्कासनाची धडक कारवाई

Bundeli Khabar

सीनियर आईपीएस अधिकारी भूषण कुमार उपाध्याय होंगे महाराष्ट्र होमगार्ड के नए डीजी

Bundeli Khabar

कैट के विरोध के बाद स्वास्थय मंत्रालय ने ऑनलाइन शॉपिंग करने के अपने विज्ञापन को वापिस लिया

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!