26.8 C
Madhya Pradesh
September 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20211018 WA0010
महाराष्ट्र

ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा डी वाय फाउंडेशनचे संस्थापक दयानंद चोरघे यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम सप्ताहाचे आयोजन

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
मुरबाड : ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा डी वाय फाउंडेशन महाराष्ट् राज्याचे संस्थापक दयानंद चोरघे यांचा वाढदिवस शुक्रवार दिनांक २२/१०/२०२१ रोजी असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांच्या सप्ताहाचे आयोजन रोहित छगन झुंजारराव
जिल्हा अध्यक्ष सोशल मीडिया डि वाय फाऊंडेशन ठाणे यांनी केले आहे. संपूर्ण देशात व राज्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता आजच्या स्थितीला महाराष्ट्रत कोरोनाची संख्या कमी होताना दिसत आहे तरीदेखील भारतीय काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री दयानंद मोतीराम चोरघे यांच्या वाढदिवसा चे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांचा सप्ताह आयोजित केला आहे. त्यामध्ये खालील प्रमाणे सप्ताहातील कार्यक्रमांची माहिती दिली आहे. भारतीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री दयानंद मोतीराम चोरघे यांचे वडील आणि पंचायत समितीचे माजी सभापती स्वर्गीय मोतीराम बाळू चोरघे यांचे सात महिन्यापूर्वी निधन झाले असले तरी वाढदिवस साजरा न करण्याचा माणस असताना देखील विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन मुरबाड तालुक्यातील रोहित छगन झुंजारराव
जिल्हा अध्यक्ष सोशल मीडिया डि वाय फाऊंडेशन ठाणे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यां सह हे आयोजन केले आहे त्यामुळे सदर वाढदिवस हा अत्यंत स्तुत्य उपक्रमाने साजरा केला जाईल असे म्हणायला वावगे ठरू नये त्यामुळे दयानंद चोरघे यांनी सदर उपक्रमांचा तपशील घेऊन हे विविध उपक्रम राबविण्यासाठी मान्यता दिली आहे. सदर् उपक्रमांची माहिती खालील प्रमाणे आहे.
बुधवार दि. २० ऑक्टोंबर २०२१ रोजी
पॅनकार्ड शिबिर व नेत्र तपासणी शिबिर
( पॅन कार्ड फक्त पन्नास रुपयात)
स्थळ बस स्थानक मुरबाड,

गुरुवार दिनांक २१ ऑक्टोंबर २०२१ रोजी
मुरबाड तालुक्यातील सर्व सीआरपी तसेच टेलरिंग प्रशिक्षण घेत असलेल्या सर्व महिलांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबीर
स्थळ इन्फिगो आय केअर हॉस्पिटल मुरबाड,
शुक्रवार दिनांक २२ऑक्टोंबर २०२१ रोजी
महाआरोग्य शिबिर
स्थळ इन्फिगो आय केअर हॉस्पिटल मुरबाड,

शनिवार दि.२३ ऑक्टोबर २०२१ रोजी
मतिमंद शाळा व जिल्हा परिषद शाळा शिरवली येथे शैक्षणिक साहित्य वाटप व मानिवली येथे बंधारा बांधणे,
रविवार दि.२४ ऑक्टोंबर २०२१ रोजी
टेलरिंग प्रशिक्षण केंद्र उद्घाटन, डि वाय फाउंडेशन मध्यवर्ती कार्यालय उद्घाटन, प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना व महिलांना प्रमाणपत्र वाटप सोहळा स्थळ काँग्रेस भवन मुरबाड,
सोमवार दिनांक २५ ऑक्टोंबर २०२१ रोजी
रोशन ऍग्रो सेंटर शिवळे येथे शेतकऱ्यांना मोफत फवारणी कवच वाटप
स्थळ रोशन अग्रो सेंटर शिवळे
सदर विविध उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्याला मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन रोहित झुंजारराव यांनी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून समस्त मुरबाड तालुक्यातील नागरिकांना केले आहे.


Bundelikhabar

Related posts

माटलवाडी युवा प्रतिष्ठाण कडून दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्य वाटप

Bundeli Khabar

लाइफ हैंडस फाउंडेशन द्वारा आयोजित ‘द स्टार एक्सिलेंस अवार्ड’ में सम्मानित हुए एसिड विक्टिम सर्वाइवर्स

Bundeli Khabar

समाजसेविका अरुणा नाभ हुई महाराष्ट्र के गवर्नर के हाथों सम्मानित

Bundeli Khabar
error: Content is protected !!