34.2 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » साक्री ग्रामीण रुग्णालयातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
महाराष्ट्र

साक्री ग्रामीण रुग्णालयातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

साक्री ग्रामीण रुग्णालयातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी! क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आम्ही सावित्रीच्या लेकी हा वसा मुलींनी आत्मसात करावा- जोशीला पगारिया
मनिलाल शिंपी/महाराष्ट्र

साक्री : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त साक्री ग्रामीण रुग्णालयात महिला शक्ति तर्फे सावित्रीबाई फुले जयंती व,बाल दिन साजरा करण्यात आला,आम्ही सवित्रीच्या लेकी घेतला शिक्षणाचा वसा हाती अशी आमची आई वंदनीय सावित्रीबाई फुले यांना वंदन करुन् प्रतिमा पूजन केले, डॉक्टर भरत गोईल, व साक्री तालुक्यातील समाजसेविका जोशीला पगारीया यांच्यासह सर्व डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी, महिला शक्ति यांनी प्रतिमेला वंदन केले, व १५ते १८ वयोगटातील विद्यार्थी लसीकरण साठी आलेल्या ना प्रोस्ताहन दिले व बाल दिन म्हणून साक्री शहरातील उत्कृष्ट अश्या सामाजिक कार्यकर्त्या महिला शक्ति च्या शान सौ जोशीला पगारिया यांच्या माध्यमातुन उपस्थित सर्वांना नोटबुक ,पेन देण्यात आले, तसेच नुक़त्यांच जन्मलेल्या मुलीना कपड़े वाटप करण्यात आले तसेच सिस्टर मुलीना ही नोटबुक ,पेन ,स्वीट देवून सन्मानित करण्यात आले, ग्रामीण रुग्णालया चे अधिकारी डॉक्टर श्री भरत गोईल यांना कोविड योद्धा म्हणून महिला शक्ति तर्फे जोशीला पगारिया यांनी कोविड योद्धा सन्मान पत्र ,फ्रेम ,शाल ,श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले, सवित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून एका परिचारिकेने खूपच सुंदर अशी कविता सादर केली, ग्रामीण रुग्णालयात सुंदर असे उपक्रम पहिल्यांदा राबविन्यात आले असे नियोजन साक्री तालुक्यात पहिल्यांदा राबविन्यात आले त्यां बद्दल कर्मचारी ,पेशंट नातेवाईक ,पत्रकार मिडिया सहित सौ जोशीला पगारिया मॅडम यांचे कौतुक करुण त्यांचे अभिनंदन करण्यात आले काही कर्मचारी ,सिस्टर यांनी सांगितले की, सौ जोशीला पगारिया , यांनी कोरोना प्रादुर्भाव मधे रोज सरकारी दवाखान्यात टिफिन सेवा दिली ,स्वतः येऊन गरजु अश्या लोकाना भेट दिली तसेच दिवाळी निमित्त सर्व आपआपल्या घरी परिवारासह दिवाळी साजरी करत असताना पगारिया ताई या परिचारिका व कर्मचाऱ्यांसोबत आमच्या घरी भेट देवून दिवाळी चा फराळ देवून आमच्या सर्वांच्या सोबत त्यानी खरी दिवाळी साजरी केली त्या सर्वांच्या सूख: दुखात वाहुन जाणाऱ्या अश्या आमच्या ताईसाहेब आहेत् त्यांचे कौतुक कीती ही केले तरी ते कमीच आहे, आज सवित्रीबाई फुले जयंती निमित्त त्यानी ज्या भेट वस्तु आणि उपक्रम राबविले त्यां बद्दल साक्री ग्रामीण रुग्णालय तर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.तसेच आदर्श माध्यमिक विद्यालय त्यांच्या घराशेजारच्या शाळेत भेट देवून सवित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, वंदन करुण लहान लहान मुलीनी सवित्रीबाई च्या वेशभूषा सारख्या साड्या नेसल्या होत्या आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणून त्यां छान संदेश देत होत्या सौ. जोशीला पगारीया यांनी त्यांचे कौतुक करुण त्याना नोटबुक पेन भेट स्वरुपात दिले कारण सवित्रीबाई फुले यांनी पेन हातात घेवून सर्वाना शिक्षणाचा धड़ा शिकविला म्हणून त्यांच्या आठवणीत सर्व विद्यार्थीना नोटबुक पेन देवून शिकण्यासाठी प्रबोधन करण्यात आले त्यांच्या या सामाजिक उपक्रमा बद्दल सर्व शिक्षकानी आभार व्यक्त केले.सदर् कार्यक्रमाला सुनीता अहिरराव ,कविता बागुल ,प्रीति वाघ ,सुलताना फ़क़ीर ,साहेबराव कारंडे ,संयम पगारीया सहित सर्व डॉक्टर्स शिक्षक ,शिक्षिका पत्रकार,कर्मचारी महिला शक्ति ,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते..

Related posts

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे जिल्हाच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात शिक्षण अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक संपन्न

Bundeli Khabar

मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्याय आणि पुरोगामी विचार मंच महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा

Bundeli Khabar

काला कौआ गैंग का पंटर के खिलाफ चीटिंग का मामला दर्ज

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!