30.4 C
Madhya Pradesh
May 5, 2024
Bundeli Khabar
Home » जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनच्या कामांना गती मिळणार
महाराष्ट्र

जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनच्या कामांना गती मिळणार

प्रमोद कुमार
ठाणे : जिल्हा परिषदेच्या माध्यमांतून ग्रामीण भागात ‘जल जीवन मिशन’ आणि ‘स्वच्छ भारत मिशन’ हे दोन अभियान राबविण्यात येत आहेत. ‘जल जीवन मिशन’च्या माध्यमातून प्रत्येक घरात नळ जोडणी करून प्रती माणसी ५५ लीटर पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तर स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून सांडपाणी घनकचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून गावं स्वच्छ सुंदर बनविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हे दोन्ही अभियान मिशन मोडवर राबवून शासनाने दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. त्यामुळे या अभियानाला गती मिळण्यासाठी या अभियानाशी निगडीत सर्व यंत्रणांची जिल्हास्तरीय कार्यशाळा बुधवारी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न झाली.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्ताने स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण) आणि जल जीवन मिशन अंतर्गत संपन्न झालेल्या या कार्यशाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, स्वच्छ भारत मिशनचे सहसचिव तथा अभियान संचालक अभय महाजन, स्वच्छ भारत मिशनचे प्रकल्प संचालक रवींद्र शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राधेश्याम आडे, स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

गावं स्वच्छ-सुंदर बनविण्यासाठी सगळ्यांचेच योगदान
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, ग्रामीण भागात स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागणे गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी हिताचे आहे. यासाठी शासकीय यंत्रणांनी गावातील नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रत्येक गावात सांडपाणी घनकचऱ्याची व्यवस्था निर्माण करून गाव स्वच्छ-सुंदर बनविण्यासाठी सगळ्यांचेच योगदान गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेतून समस्यांचे निराकरण
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधतांना ही कार्यशाळा तुमच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आयोजित आयोजित केली असल्याचे सांगत, या दोन्ही अभियानाची ग्रामीण भागाला किती उपयुक्तता आहे याचे महत्व स्पष्ट केले. ते म्हणाले, पाणी म्हणजे जीवन. हे पाणी आपण प्रत्येक घरात पुरेशे देऊ शकलो तर यासारखे दुसरे समाधान नाही. त्यामुळे प्रत्येकाने याकामात तन-मनाने सहभागी व्हा ! प्रामाणिकपणे काम करा! जल जीवन मिशनचे काम करण्याबरोबर स्वच्छ भारत मिशनमधून प्रत्येक गावात शाश्वत स्वच्छता निर्माण करणे आपली जबाबदारी आहे. वाढते शहरीकरण, वाढती लोकसंख्या, वाढलेले प्रदूषण यामुळे गावातील आरोग्य सांभाळणे गरजेचे असल्याचे डॉ. दांडगे यांनी सांगितले. येत्या काळात या दोन्ही अभियानासह सर्वच योजनांचा तालुकास्तरावर प्रत्येक्ष येऊन सखोल आढावा घेणार असल्याचा सुतवाचही त्यांनी केला.

लोकप्रतिनिधी म्हणून सर्वोतपरी सहकार्य
यावेळी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हात झालेल्या कामांची आठवण सांगताना या अभियानात देखील उत्कृष्ट काम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. करोनामुळे मागील दोन वर्षात ठळक कामे करता आली नाहीत मात्र आता गावकार्यांना विश्वासात घेऊन कामांना गती आणता येईल.यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून सर्वोतपरी सहकार्य करण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला. या अभियानातून प्रत्येक घरात नळ जोडणी होईल, मुबलक पाणी मिळेल, त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनमुळे वैयक्तिक स्वच्छतेबरोबर गावातील कचऱ्याचे नियोजन, सांडपाण्याचे नियोजन करता येईल. ह्या बाबी आरोग्याच्यादृष्टीने महत्वाच्या असल्याचे ते म्हणाले.

मार्च २०२२ अखेर अभियानाची उद्दिष्टपुर्ती
या कार्यशाळेला आवर्जून उपस्थित राहिलेले स्वच्छ भारत मिशनचे सहसचिव तथा अभियान संचालक अभय महाजन यांनी उपस्थित सर्व अधिकारी – कर्मचाऱ्याशी प्रेरणादायी संवाद साधत, हे दोन्ही अभियान मनावर घ्या, पूर्णत्वाला नेहण्याचा चंग बांधा ! असे भावनिक आवाहन केले. त्यांनी अभियानाचे महत्व, शासनाची भूमिका आणि आपण अभियान कसे राबविले पाहिजे याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत स्वच्छ भारत मिशन टप्पा दोनच्या एकंदर कार्यप्रणाली बाबत स्वच्छ भारत मिशनचे प्रकल्प संचालक रवींद्र शिंदे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. मार्च २०२२ अखेर या अभियानाची उद्दिष्टपुर्ती करायची असल्याचे सांगत, या अभियानासाठी निधीची कमतरता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या अभियानात सर्वच यंत्रणाचा तत्परतेने सहभाग महत्वाचा असल्याचे अधोरेखित करताना शौचालय वापरासाठी नागरिकांना प्रवृत्त करा, लोकांची मानसिकता बदला असे आवाहन त्यांनी यंत्रणांना केले.

तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन
या कार्यशाळेसाठी विविध विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये युनिसेफचे राज्य समन्वयक आनंद घोडगे यांनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापक करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो व त्याचे महत्व पटवून दिले. एमर्जी इन्व्हारो आय.आय.टी.मुंबईचे योगेश राऊत यांनी सांडपाणी घनकचरा बद्दल नव्या तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले. राज्य सनियंत्रण व मूल्य मापन तज्ज्ञ सुजाता सामंत यांनी स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशनच्या कामाच्या नोंदी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर कशा ठेवाव्यात, पोर्टलवर अहवाल कसे तयार होतात याची सखोल माहिती दिली. प्रायमो संस्थेचे राज्य समन्वयक मंदार साठे यांनी जल जीवन मिशन अंतर्गत गाव कृती आराखडा (vap) आणि अंदाजपत्रक ( cost estimatition) ऑनलाइन कसे भरायचे आणि त्याचे फायदे याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा राध्येश्याम आडे यांनी जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीबाबत भाष्य केले. तर जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीबाबतची तांत्रिक बाजू अधीक्षक अभियंता निरभवणे यांनी सांगितली. १५ वा वित्त आयोगामध्ये बंधीत आणि अबंधित निधीचा विनियोग कसा करावा याचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्न उत्तर घेण्यात आली. यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तज्ज्ञांनी उत्तरे दिलीत.

दरम्यान सभागृहाबाहेर अभियानासंदर्भातील विविध साहित्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. मान्यवरांनी या प्रदर्शनालाही भेट दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ यांनी करत कार्यशाळेचे नियोजनही उत्कृष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेंद्र बांगर यांनी केले. या कार्यक्रमाला यावेळी तज्ज्ञ शैलेश कानडे, विजय गवळी, नंदकिशोर शिंदे, अमोल शिंदे, गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी स्वच्छ भारत मिशन आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते

Related posts

ठाणे जिल्हा युवागट चाचणी कुस्ती स्पर्धा २०२१ कलानिकेतन मंडळ सभागृह कोनगाव येथे मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

Bundeli Khabar

दिवानेश्वर महादेव संस्कृत पाठशाला का शत प्रतिशत शत परिणाम घोषित

Bundeli Khabar

क्राइम एन्ड करप्शन कंट्रोल एसोसिएशन कार्यालय का हुआ शुभारंभ

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!