22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » ‘मजेंटा’ने मध्य रेल्वेच्या सहकार्यातून रेल्वे स्थानकांवरील सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्थानकांचा शुभारंभ
महाराष्ट्र

‘मजेंटा’ने मध्य रेल्वेच्या सहकार्यातून रेल्वे स्थानकांवरील सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्थानकांचा शुभारंभ

संतोष साहू/महाराष्ट्र,

मुंबई : झपाट्याने वाढणारी भारतीय चार्ज पॉइंट ऑपरेटर (सीपीओ) कंपनी ‘मजेंटा’ने मध्य रेल्वेच्या सहकार्यातून परेल रेल्वे स्थानकामध्ये एका सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्टेशनचा शुभारंभ केला. या चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन महाराष्ट्राचे उद्योग व खनिजकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी केले. या शुभारंभ प्रसंगी महावीर लुनावत, किरण पटेल, मैक्सन लेविस आणि पल्लवी पटेल उपस्थित होते. पुढील दोन आठवड्यांमध्ये ‘मजेंटा’ दादर आणि भायखळा या दोन स्थानाकांमाध्येही ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहे.
अशाप्रकारचे हे पहिलेच चार्जिंग स्टेशन असून ते सुरुवातीला भारतीय बनावटीच्या तंत्रज्ञानाच्या आधारे पथदिव्यांशी संलग्न असे ईव्ही चार्जिंग स्टेशन (चार्जग्रीड फ्लेअर)वर २४ तास चालणार आहे. नंतर ते डीसी फास्ट चार्जर तंत्रज्ञांवर चालेल. एसी आणि डीसी चार्जरच्या या संलग्निकरणामुळे दुचाकी, तिचाकी आणि चारचाकी वाहनांना मदत होणार आहे. हे चार्जर स्टेशन चार्जग्रीड अपद्वारे ऑपरेट केले जातील आणि त्यासाठी ऑनलाईन रिमोट मॉनीटरिंग पद्धती उपलब्ध असेल. त्यात ऑटोमेटेड पेमेंट गेटवे उपलब्ध असेल की जेणेकरून या चार्जर स्टेशनजवळ कुणी चालक उपलब्ध असण्याची किंवा त्याच्या देखभाल, वापराची विशेष मानवी व्यवस्था त्याठिकाणी करण्याची गरज नाही.
‘मजेंटा’ सध्या भारतातील १०८ शहरांमध्ये ४५०० चार्जर (२९५० चार्जर हे फेम-२ योजनेंतर्गत आरईआयएलमध्ये; १२०० हून अधिक हे एचपीसीएल व इतर पेट्रोल पंपांवर; ८२ फर्न हॉटेल्समध्ये; दिल्ली सरकारबरोबरच्या सहकार्यातून तसेच बेंगळूरू अपार्टमेंट फेडरेशनच्या सहकार्यातून निवासी चार्जर यांचा त्यात समावेश) उभारणार आहे. २०२६ पर्यंत तब्बल २० लाख इलेक्ट्रिक वेहीकल्स (ईव्ही) रस्त्यांवर धावतील असा अंदाज असून त्यासासाठी सरकारने ४ लाख चार्जिंग स्टेशन उभारण्याचे जे लक्ष्य समोर ठेवले आहे, त्याला सहकार्य करण्याचे काम यातून होणार आहे.
‘मजेंटा ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक आणि सहसंस्थापक श्री मॅक्सन ल्युईस म्हणाले, “वैयक्तीकरित्या पाहिले तर मुंबईच्या रेल्वे स्थानकात ईव्ही चार्जर उभारणे हे माझ्यासाठी स्वप्न प्रत्यक्षात येण्यासारखे आहे. सर्वसामान्य माणसाची जी चार्जिंग स्टेशनची चिंता आहे, ती मिटवल्यशिवाय ईव्हीचे जाळे उभारण्याचे धोरण प्रत्यक्षात येवू शकत नाही. म्हणून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी अगदी सोयीच्या व जिव्हाळ्याच्या अशा रेल्वे स्थानकांवर असे ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासारखी दुसरी संकल्पना काय असू शकते.”
महाराष्ट्राचे उद्योग व खानीजकर्म मंत्री सुभाष देसाई म्हणाले, “मजेंटा’ आणि मध्य रेल्वे मिळून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे हरित धोरणाला बळकटी दिली जात आहे आणि त्यासाठी ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारले जात आहे, याचा आम्हाला आनंद आहे. त्या माध्यमातून ईव्हींच्या चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांची जी कमतरता आहे, ती दूर केली जाईल. याद्वारे लोक आता त्यांच्या ईव्ही त्यांच्या सोयीनुसार रेल्वे स्थानकांजवळ चार्ज करू शकतात. त्यांना हा खास दिलासा आहे.”
डॉ किरण सी पटेल म्हणाले, “मजंटा परिवाराशी जोडले जात असल्याचा मला अभिमान आहे. या माध्यमातून ईव्ही-स्नेही भारताचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास मदत होणार आहे. पथदिवे आधारित रेल्वे स्थानकातील ईव्ही चार्जिंग स्टेशन ही अनोखी संकल्पना आहे कारण ती भारतात आणि भारतासाठी बनली आहे.”

Related posts

निर्माता अभय सिन्हा चुने गए इम्पा के नए प्रेसिडेंट

Bundeli Khabar

राज्यपाल के हाथों अमोल पालेकर, सुनील गावस्कर, सुरेश वाडकर, उषा मंगेशकर सहित 50 हस्तियों को मिलेगा महाराष्ट्राची गिरीशिखरे अवार्ड

Bundeli Khabar

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!