32.6 C
Madhya Pradesh
April 16, 2026
Bundeli Khabar
Home » जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
महाराष्ट्र

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Bundelikhabar

प्रत्येक महिलेने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा चा आदर्श पुढे ठेवून समाजामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे – ज्येष्ठ सिनेअभिनेते सुषमा शिरोमणी

ठाणे – मराठी साहित्य मंडळ आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय काव्य संमेलन पुरस्कार सोहळ्याप्रसंगी, चित्रपट दिग्दर्शक सुभाष काळे यांच्या अध्यक्षतेखाली, ठाणे महानगरपालिका महापौर नरेशजी म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत, ज्येष्ठ सिनेअभिनेत्री मराठी सिनेमातील फटाकडी या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुषमा शिरोमणी यांना, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट आणि ज्येष्ठ कवियत्री राष्ट्रीय उपाध्यक्ष ललिता गवांदे यांच्या हस्ते, साहित्यातील कला भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांनी सांगितले की, 1996 नंतर सर्वांना मी या जगात आहे की नाही ही शंका होती परंतु चित्रपट डायरेक्टर सुभाष काळे साहेबांनी माझ्या कलागुणांना माझ्यातील अभिनेत्रीला पुन्हा प्रेक्षकांसमोर आणून मला पुनर्जन्म दिला आहे. व त्यांच्या मुळेच मला हा कला भूषण पुरस्कार आज प्राप्त झाला आहे. जागतिक महिला दिन निमित्त ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांनी सर्व महिला भगिनींना आव्हान केले की, महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श समोर ठेवून समाजामध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे. जागतिक महिला दिनानिमित्त मराठी साहित्य मंडळ ठाणे यांच्यातर्फे प्राचार्य रेखा दिक्षित (कोहापुर) यांना विद्या भूषण पुरस्कार देण्यात आला. अर्चना पानारी (कोल्हापूर) यांना साहित्यभूषण म्हणून गौरवण्यात आले. तर डॉ प्रियंका सारंग यांना समाज भूषण डॉ.तृप्ती महाडिक यांना वैद्दिक भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. निवेदिका म्हणून अनघा जाधव यांना निवेदिका भूषण म्हणून गौरव करण्यात आले. मराठी साहित्य मंडळाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष ललिता गवांदे यांनी थोडक्यात प्रास्ताविक मांडले. व अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी जागतिक महिला दिन प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील सावित्रीच्या शोध घेऊन विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार देऊन साजरा केला जातो याविषयी माहिती दिली. याप्रसंगी ज्येष्ठ कवयत्री डॉ रजनी दळवी, मराठी साहित्यिक डॉ.सरोज भोसले, आपले मनोगत व्यक्त केले. आर एस पी कमांडर मणिलाल शिंपी यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देणारे खानदेशी अहिराणी भाषेत काव्य, (गीत) प्रेक्षकांसमोर बोलून दाखवले. खानदेशी काव्य ऐकून प्रेक्षकांनी अत्यंत आनंदात टाळ्यांचा जल्लोषात मनिलाल शिंपी यांचे अभिनंदन केले. फिल्म डायरेक्टर काळे आणि प्रसिद्ध ज्येष्ठ सिनेअभिनेत्री सुषमा शिरोमणी यांच्या हस्ते निमंत्रित कवी म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी आर एस पी अधिकारी भानुदास शिंदे यांनाही सन्मानित करण्यात आले. शिंदे यांनीही सुंदर अशी कविता सादर केली. सदर कार्यक्रमास ठाणे जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक नामवंत कवी व नवोदित कवी यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका अनघा जाधव यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष ललिता गवांदे यांनी उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनांनी आभार मानले.


Bundelikhabar

Related posts

मेक्सविन ह्यूमेन केयर फाउंडेशन द्वारा पुरस्कार सम्मान समारोह का आयोजन

Bundeli Khabar

24 घंटे के भीतर मोबाइल चोर को किया गिरफ्तार

Bundeli Khabar

शिवसेना की तरफ से निशुल्क स्वास्थ्य उपचार शिविर की शुरुआत

Bundeli Khabar
error: Content is protected !!