19.8 C
Madhya Pradesh
September 26, 2026
Bundeli Khabar
IMG 20211230 WA0003
महाराष्ट्र

डोंबिवली पूर्व येथील दत्तनगर परिसरातील तळ+5 मजली अनधिकृत इमारतीवर निष्कसनाची कारवाई

Bundelikhabar

प्रमोद कुमार

कल्याण :- महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार व विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागक्षेत्र 8/ग अंतर्गत दत्तनगर डोंबिवली पूर्व, येथील विकासक प्रफुल्ल गोरे यांच्या शिव दत्तकृपा या तळ + 5 मजल्याच्या इमारतीचे अनधिकृत बांधकाम रहिवास मुक्त करून आज निष्कासनाच्या कारवाईस सुरूवात करण्यात आली आहे. सदर निष्कासनाची कारवाई रामनगर पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी सचिन सांडभोर व पोलिस कर्मचारी , अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात येत आहे. ही कारवाई फ प्रभागाचे सहा.आयुक्त किशोर शेळके, ग प्रभागाच्या सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे, क प्रभागाचे सहा. आयुक्त सुधीर मोकल, ह प्रभागाचे सहा. आयुक्त अक्षय गुडधे , इ प्रभागाचे सहा आयुक्त भारत पवार, प्रभाग अधिक्षक दिनेश वाघचौरे , प्रभाग अधिक्षक ज्ञानेश्वर कंखरे ,प्रभाग अधिक्षक शंकर धावारे यांचे उपस्थितीत आणि 1जाॅ क्रशर मशीन, 1 पोकलेन, 1 जेसीबी , 10 मजूर यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.


Bundelikhabar

Related posts

कला प्रदर्शनी में सराही गई शिल्पी खरे

Bundeli Khabar

सेलिब्रिटीजना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हिपीचे खास फिचर

Bundeli Khabar

ठाणे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी पदी अविनाश फडतरे यांची नियुक्ती

Bundeli Khabar
error: Content is protected !!