32.2 C
Madhya Pradesh
May 1, 2024
Bundeli Khabar
Home » आपलं गाव शाश्वत स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र

आपलं गाव शाश्वत स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे प्रतिपादन

किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : जिल्ह्यातील खेडी स्वच्छ आहेत ती अजून शाश्वत स्वच्छ करायची आहेत. यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्वाचा आहे. आपलं गाव शाश्वत स्वच्छ करण्याचा प्रत्येकाने निश्चय करून योगदान दिले तरच स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ स्पर्धेत आपल्या जिल्हाला घवघवीत यश मिळेल असे प्रतिपादन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी केले. शुक्रवारी दूरदृश्यप्रणाली द्वारे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. त्यावेळी जिल्हातील विविध सर्व शासकीय यंत्रणासह ग्रामस्थ, बचत गटातील महिलांशी त्यांनी संवाद साधला.
केंद्र शासनाच्या वतीने ग्रामीण भागात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तत्पूर्वी स्वच्छतेबाबतच्या सर्व निकषांची पूर्तता करून घेण्यासाठी गावकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची भूमिका महत्वाची आहे. एकमेकांच्या साथीनेच आपलं गाव स्वच्छ-सुंदर बनवून या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत उज्वल यश संपादन करता येईल. आजच्या घडीला गावोगावात स्वच्छतेचे चळवळ स्वरुपात उत्तम काम सुरु असले तरी देखील त्या कामांवर समाधानी न राहता शाश्वत आणि व्यापकपणे काम करण्याची सूचनाही श्री. दांगडे यांनी केली.
एस.एस.जी २०२१ ॲपवर प्रतिक्रिया नोंदवा,यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ यांनी कार्यशाळेचे प्रस्ताविक केले. त्याचबरोबर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ च्या संपूर्ण सर्वेक्षणाची माहिती देतानाच
ठाणे जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी प्ले स्टोरवरून एस.एस.जी २०२१ ( SSG २०२१) हे अप्लिकेशन डाऊनलोड करून आपल्या जिल्हातील स्वच्छतेच्या सध्यस्थितीबाबत प्रतिक्रिया नोंदविण्याचे आवाहनही श्री. गुंजाळ यांनी केले. याकार्यशाळेला मोठ्या संख्यने अधिकारी, कर्मचारी आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

Related posts

प्रतिभाशाली खिलाड़ियों को राष्ट्र स्तर पर प्रोत्साहित करेंगे सुनील राणे

Bundeli Khabar

आंबिवली ग्रामस्थांची श्रमदानातून ग्रामस्वच्छता    

Bundeli Khabar

अप्लॉज एंटरटेनमेंट ने चेन्नई में खोला एक नया ऑफिस

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!