33.2 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » बंदूकीचा धाक दाखवून ट्रान्सपोर्टरसह दोघांचे अपहरण
महाराष्ट्र

बंदूकीचा धाक दाखवून ट्रान्सपोर्टरसह दोघांचे अपहरण

बंदूकीचा धाक दाखवून ट्रान्सपोर्टरसह दोघांचे अपहरण
२५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण

संदीप शेंडगे.
टिटवाळा : महागणपती मंदिराजवळ रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवू नएका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा व त्याच्या सहकार्याचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण केल्याची घटना कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिटवाळा येथे घडली आहे. या दोघांचे अपहरण करून आरोपींनी त्यांच्या कडून २५ रुपयांचे लाखांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी टिटवाळा पोलीसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अपहरणकर्त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. टिटवाळा पूर्व येथील गणपती मंदिराजवळ राहणारा लोकेश पवार आणि त्याचा मित्र राजेश कोर हे २२ डिसेंबरला दुपारी घरी जात होते, त्याच दरम्यान आरोपींनी टिटवाळा मंदिर नजीक त्यांचे अपहरण केले.

त्यावेळी आरोपी कुणाल नानू रावते आणि त्याचे साथीदार जॅक, हॅरी आणि एक यादव या चार जणांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लोकेश पवार आणि राजेश कोर यांचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी त्यांना इगतपुरी येथे नेले आणि तेथील एका फार्महाऊसमध्ये बंद केले. अपहरणकर्त्यांनी लोकेश आणि राजेश यांना दोन दिवस फार्महाऊसमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर कुटुंबीयांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून २५ लाखांची रक्कम मागितली.

या घटनेने कल्याण तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी पुन्हा सक्रिय होत आहे की काय अशी शंका नागरिकांना येत आहे.

Related posts

आईटी मिनिस्टर अजीत पाल के कार्यक्रम में पत्रकार अरुण कमल हुए सम्मानित

Bundeli Khabar

गैस सिलेंडर से भरे ट्रकों की अवैध पार्किंग

Bundeli Khabar

इंजिनीयर मनोज सखाराम माडगुळकर यांच्या विरोधात, महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!