31.5 C
Madhya Pradesh
October 6, 2026
Bundeli Khabar
IMG 20211227 WA0007
महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यातील परीवर्धा येथील गोविंद श्रीपत पाटील शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

Bundelikhabar

आर एस पी कमांडर मणिलाल शिंपी यांचे विशेष सहकार्य
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यतील शहादा तालुक्यातील गुरुवर्य गोविंद श्रीपत पाटील माध्यमिक विद्यालय परिवर्धा या शाळेत , परिवर्धे येथील सुपुत्र, महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन ओरिसा गव्हर्मेंट चे महाराष्ट्र राज्य ब्रँड ॲम्बेसेडर अँड डायरेक्टर, आर एस पी अधिकारी युनिट कमांडर मणिलाल शिंपी यांच्या विशेष प्रयत्नाने, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान कमिटीचे तपासणी अधिकारी सन्माननीय डॉ. किशोर बळीराम पाटील यांच्या सौजन्याने,इयत्ता पाचवी तील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य म्हणून शालेय बॅग दप्तर वाटप करण्यात आले.

याप्रसंगी नवनिर्वाचित जि.प.सदस्य तथा नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहनभाई शेवाळे, परीवर्धा येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेले डॉ.किशोरजी अमोदकर या मान्यवरांचा शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय जे.एस.पाटील सर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. वरील सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते इ.पाचवीतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. वरील कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आपल्या गावातील शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्याने मोठ्या परिश्रमाने आपल्या नावाचा व शाळेचा, गावाचा नावलौकिक संपूर्ण देशभर केल्याने मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच पुढील वाटचालीस मणिलाल शिंपी यांना शुभेच्छा दिल्या.


Bundelikhabar

Related posts

नैब राजस्थान द्वारा गीता ज्ञान ऑनलाइन प्रतियोगिता का आयोजन सम्पन्न

Bundeli Khabar

कोपर रेलवे फ्लाईओवर जल्द ही हो सकता है शुरू ।

Bundeli Khabar

कार्यभार दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी स्वीकारला

Bundeli Khabar
error: Content is protected !!