21.9 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » डिसिफर लॅब्सने अल्पावधीत दिले १५० टक्क्यांनी परतावे
महाराष्ट्र

डिसिफर लॅब्सने अल्पावधीत दिले १५० टक्क्यांनी परतावे

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : माहिती-तंत्रज्ञान उद्योगात सेवा आणि उपाय प्रदान करण्यात गुंतलेल्या डिसिफर लॅब्सने मुंबई शेअर बाजाराला ते विस्ताराच्या उद्दिष्टांसाठी आक्रमकपणे काम करत असल्याचे सांगून आपल्या भागधारकांना १५० टक्क्यांनी परतावे दिले आहेत. फार्मा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यवसायांच्या संपादनाच्या पर्यायांसह कंपनीच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी विविध प्रस्तावांवर देखील कार्य करण्यात येत असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपले स्थान बळकट करण्याच्या उद्देशाने कंपनीने तिच्या उपकंपनीद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी स्पेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे. त्याबरोबर तंत्रज्ञानाच्या अनेक घटकांच्या विकासासाठी आणि विपणनासाठी अमेरिकास्थित कंपनीशी चर्चा सुरू केली आहे. ही प्रक्रिया प्रारंभीच्या टप्प्यात आहे आणि कंपनी नेमके स्वरूप आणि व्यवस्थेच्या अटी अद्ययावत करेल. जेव्हा ते अंतिम होईल तेव्हा, त्यानंतरच्या योग्य व्यवहार्यताविषयी अहवाल देईल. सामग्री निर्मिती, अभियांत्रिकी इत्यादींसह विविध पोर्टफोलिओ क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वाढता अवलंब आणि अनुकूल सामग्री तयार करण्यासाठी व्हर्च्युअल ऍप्लिकेशन्सच्या विकासामुळे भारताच्या संवर्धित वास्तव आणि आभासी वास्तविकता बाजारपेठेमध्ये मजबूत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

२२ नोव्हेंबर २०२१ रोजी ३४ रुपये असलेल्या शेअरच्या किमतीने ३० दिवसांपेक्षा कमी कालावधीत १५० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. अलीकडील सर्वेक्षणानुसार, आभासी वास्तविकता बाजार १०४.२४% वार्षिक दराने वाढत आहे. तसेच भारत सरकारने अनेक विकास कार्यक्रम सुरू केले आहेत, जे या उद्योगाला पाठिंबा देत आहे. विश्लेषकांच्या मते, या सकारात्मक घडामोडी, डिसिफरमध्ये उच्च वाढीची शक्यता निर्माण करत आहेत.


Bundelikhabar

Related posts

खासदार संजय राऊत यांनी केले पत्रकार संघाच्या उपक्रमांचे कौतुक

Bundeli Khabar

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर मंगळवारी घेणार

Bundeli Khabar

पूर्वांचल गौरव सम्मान 2022 की चयन प्रक्रिया आरम्भ

Bundeli Khabar
error: Content is protected !!