22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » प्रदूषणाचा भस्मासुर माणसाच आयुष्य संपवत आहे म्हणून ” नो व्हेइकल डे” उपक्रम पेण मध्ये शुभारंभ.
महाराष्ट्र

प्रदूषणाचा भस्मासुर माणसाच आयुष्य संपवत आहे म्हणून ” नो व्हेइकल डे” उपक्रम पेण मध्ये शुभारंभ.

प्रतिनिधी-विनोद चव्हाण
संत गाडगे बाबा पुण्यतिथीचे औचित्य साधून पेण शहर व तालुक्यामध्ये” नो व्हेइकल डे” उपक्रमाचा शुभारंभ मा. देवेंद्र पोळ पोलीस निरीक्षक पेण पोलीस स्टेशन , मा. प्रसाद कालेकर नायब तहसीलदार पेण, सतीश शिंदे पो. उपनिरीक्षक पेण , मोहिनी गोरे, नमिता म्हात्रे, मनोरमा मानकवळे मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमाचे शुभारंभ करण्यात आला.

माणसांच्या वाढत्या गर्दी बरोबर वाहनांची गर्दी वाढत आहे, वाहन हे जणू काही चैनीची गोष्ट झालेली आहे. त्यामुळे वाहनांचा अतिरेक वापर होत असल्याने प्रदूषणामध्ये अधिक भर पडत आहे. हवेतील 50% प्रदूषण वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे होतो. या वायूमुळे अनेक आजार उद्भवत आहेत. मेंदूशी निगडीत समस्या, दम लागणे अनेक शारीरिक व्याधींना माणसं बळी पडत पडत आहेत. तसेच भरधाव वेगाने वाहन चालवून अपघाताचे प्रमाण वाढत आहे. माणसाला वाहनांची एवढी सवय झालेली आहे की घरातून बाहेर पाऊल टाकलं की लगेच गाडीवर बसायचं आणि पुढचा प्रवास सुरु त्यामुळे चालणं माणूस विसरत चालला आहे. आज सायकल चालवणे तरुणांना कमीपणाचे वाटत आहे. परंतु या सायकली मुळे आपलं शरीर निरोगी व सुदृढ राहतं, शरीराचा व्यायाम होतो. चालण्याने हृदयाचे स्नायू मजबूत होतात. आपले स्वादुपिंड नीट काम करते. पचनशक्ती सुधारते. सकारात्मक ऊर्जा मिळते. शरीरामधील रक्ताभिसरण योग्य होते. असे अनेक फायदे आपण चालल्यामुळे होत असतात.

धावपळीच्या जगामध्ये वावरत असताना माणसं वाहन शिवाय राहू शकत नाहीत अशी परिस्थिती दिसत आहे परंतु एकीकडे प्रदूषणाचा भस्मासुर माणसाच आयुष्य गिळंकृत
करीत आहे हे देखील विसरता कामानये, दिवसेंदिवस रोगराई वाढत आहेत हे सगळं थांबवणं एक निरोगी आयुष्य जगणं हे आपल्याच हातात आहे. म्हणून वृक्षमित्र प्रा. उदय मानकवळे यांच्या संकल्पनेतून पेण शहर व तालुक्यामध्ये दर महिन्याच्या 20 तारखेला” नो व्हेइकल डे ” सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये अनेक विद्यार्थी, सामाजिक संघटना, नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन प्रदूषण कमी करण्याचं प्रयत्न करू व दर महिन्याच्या वीस तारखेला” नो व्हेइकल डे ” हा एक उत्सव म्हणून साजरा करू असा त्यांनी संकल्प केला.

“वेळ घालवण्यासाठी नाही तर वेळ वाचवण्यासाठी” उपयोग करू. राष्ट्रीय संपत्ती पेट्रोल, डिझेल यांचीही बचत करू. असा तरुणाईने संकल्प केला आहे. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी तरुण पिढीने वाहनांचा वापर योग्य वेळी व योग्य कामांसाठी करावा. प्रदूषण कमी करावं. प्रशासनाला मदत करून वाहनांचे नियम पाळावेत. आपलं आरोग्य निरोगी व सुदृढ राहील यासाठी चालणे, व्यायाम करणे सायकल चालवणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाने “नो व्हेइकल डे ” हे पाळणे गरजेचे आहे असे आवाहन केले आहे. पेण शहर व तालुक्यामध्ये कॉलेजमधील विद्यार्थ्यां मार्फत जनजागृती केली जात आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. खुशी शेटे यांनी केले.

Related posts

हिंदुत्व में सशक्त भूमिका निभा रहे हैं लक्ष डेढा

Bundeli Khabar

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने एक्टर, डायरेक्टर मुकेश आर के चौकसे का किया सम्मान

Bundeli Khabar

एनसीपीईडीपी का यूनेस्को के साथ सहयोग

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!