22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन च्या माध्यमातून “”भागवत पाटील”” यांची मोफत हृदय रोग शस्त्रक्रिया संपन्न.
महाराष्ट्र

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन च्या माध्यमातून “”भागवत पाटील”” यांची मोफत हृदय रोग शस्त्रक्रिया संपन्न.

ठाणे : भागवत मधुकर पाटील हे ४५ वर्षाचे असून ते मु. हिंगणे बु .ता.जामनेर. जि. जळगाव येथील असून त्यांना चालताना दम लागत असे. आणि छातीत त्रास होत असल्यामुळे त्यांनी जवळपास 6 ते 7 महिन्या पासून सरकारी.खाजगी असे अनेक हॉस्पिटलमध्ये तपासणी केली . डॉक्टरानी त्यांना हृदयाशी संबंधित चाचण्या करण्यास सांगितल्या. यामध्ये ईसीजी , टू डी इको करण्यात आली.रिपोर्ट मध्ये भागवत पाटील यांना हृदयाला होल आहे असे सांगण्यात आले. खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांना 3 ते 4 लाख खर्च सांगण्यात आला. त्यांनी काही सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रयत्न केले.परंतु हॉस्पिटल वाले फक्त ऑपरेशन ची तारीख वर तारीख देत होते. परंतु भागवत पाटील यांचे ऑपरेशन काही झाले नाही. भागवत पाटील त्यांचे कुटुंबीय हताश झाले होते.त्यांचे एरंडोल चे नातेवाईक श्री रतिलाल पाटील ( पत्रकार ) यांनी आरोग्यम् धनसंपदा फौंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क केला . भागवत पाटील यांना तेरणा हॉस्पिटल ला जाण्यासाठी सांगितले. आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी हॉस्पिटल मध्ये कॉल वर सांगितले.

श्री भागवत पाटील यांची परिस्थिती नसल्याकारणाने पुढील उपचार आपल्या हॉस्पिटलमध्ये मोफत झाले पाहिजे. त्यांना सर्व रिपोर्ट घेऊन हॉस्पिटल नेरुळ या ठिकाणी जाण्यास सांगितले. तेरणा हॉस्पिटल मध्ये भागवत पाटील यांना त्या दिवशी ॲडमिट करण्यात आले. त्यांचे सर्वे रिपोर्ट बघून परत डॉक्टरांनी त्यांना टू डी इको चा रिपोर्ट मोफत करून घेतला .डॉक्टरनी त्यांना ऑपरेशन चा काही धोखा नाही आहे. आणि डॉक्टरांनी दोन. तीन दिवसात त्यांची बॉडी फिटनेस करून. त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया सक्सेसफुल झाल्यानंतर भागवत पाटील यांना तीन चार दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून आता सुट्टी करण्यात आली आहे, त्यांच्यावरील हॉस्पिटल मध्ये सर्व उपचार मोफत मध्ये करण्यात आले. असल्याची माहिती आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली.

भागवत पाटील आता त्यांच्या परिवारासोबत ठणठणीत आहेत. श्री भागवत पाटील यांच्या कुटुंबीयांनी आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांचे खूप खूप आभार मानले असून यापुढे असेच सहकार्य आपणाकडून मिळावे अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

Related posts

आंबिवलीत स्वातंत्र्यदिनानिमित्त गोरगरिबांना धान्यवाटप

Bundeli Khabar

आईजी इंटरनेशनल ने पीडब्ल्यूसी की सहायता से ईएसजी कार्यक्रम पर दिया ज़ोर

Bundeli Khabar

कैलाश मासूम को म्यांमार एम्बेस्सी से मिला ‘बुद्धा पीस अवार्ड’

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!