23.3 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी डॉ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांची संबंधित कार्यालयांना भेट
महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी डॉ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांची संबंधित कार्यालयांना भेट

मनिलाल शिंपी
ठाणे : रायगड जिल्ह्यातील विविध शैक्षणिक प्रश्न सुटावेत म्हणून महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आज रायगडच्या शिक्षणाधिकारी माननीय सौ ज्योती शिंदे व पे युनिट अधीक्षिका श्रीमती रुपाली सावंत यांची भेट घेऊन खालील प्रश्न त्वरित सोडवून घेतली
१) सहशिक्षक श्री,अली म्हसला यांची निवड श्रेणीच्या ऑर्डर मागील निवेदनातील मिळवून दिली,
२)श्री नामदेव फापाळे पाली यांचे मेडिकल बिल मंजूर करून घेतले
तसेच मागील निवेदनातील प्रलंबित कामांविषयी चर्चा केली, त्यातील बरीच कामे ऑलरेडी शिक्षणाधिकारी यांनी पूर्ण केली असून ,काही कामांमध्ये त्रुटी होत्या त्याची पूर्तता करण्यासाठी संबंधित शाळांना कळविण्यात आलेले आहे.
तसेच सोबतच्या निवेदनातील नवीन विषय सुद्धा देण्यात आले सदर विषय तातडीने सोडवण्याची विनंती शिक्षणाधिकारी यांना केली
पे युनिट अधीक्षिका श्रीमती सावंत मॅडम यांची भेट घेऊन सोबतच्या निवेदनातील प्रमुख मागण्यांची चर्चा केली, व खालील विषय तातडीने सोडवण्यात आले आहेत्,
१) रायगड जिल्ह्यातील २०% अनुदान मंजूर झालेल्या १५ उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतरांचे पगार मंजूर झालेल्या आहेत त्रेचाळीस केल्या जातील एक आठवड्यात पगारी येतील,
२)पीएफ स्लिपांची कॅम्प लवकरच लागणार असून सर्व शाळांना एक स्लिपा दिल्या जाणार आहेत,
३)पीएफ ना परतावा व सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे फायनल पेमेंट मंजूर करून घेतलेल्या आहेत ,बि.डि.एस सुरू झाल्यावर लगेच रक्कम मिळेल सुरु करण्यासाठी संघटनेच्यावतीने मंत्रालयात पाठपुरावा सुरू आहे
यावेळी रायगड जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री. रवींद्र पाटील , उर्दू माध्यमाचे समन्वयक श्री.फरीद काझी , ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे उपाध्यक्ष श्री. विलास आंग्रे , पेण तालुका हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री.सुरेश मोकल , श्री नामदेव फापाळे , श्री.अली तसेच समस्याग्रस्त आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related posts

आमिर खान और करीना कपूर खान अभिनीत ‘लाल सिंह चड्ढा’ की शूटिंग हुई पूरी

Bundeli Khabar

वसई में खुला ‘डॉक्टर जोशीज होलिस्टिक मल्टीस्पेशलिटी क्लीनिक

Bundeli Khabar

शून्य शिल्लक बचत खाते ‘फ्रीओ सेव्ह’ सुरू करण्यासाठी आले एकत्र

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!