22.6 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20211218 WA00112
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाने औषध निरीक्षक या पदासाठी असलेल्या तिन वर्ष अनुभवाची अट कायमस्वरूपी रद्द करावी- संजीवन म्हात्रे

Bundelikhabar

मुंबई – अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून मुंबई एफडीए (food & drug administration) ला अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून मुंबई एफडीए (food & drug administration) ला औषध निरीक्षक या पदासाठी असलेल्या अनुभवाची अट कायमस्वरूपी रद्द करावी अशी मागणी अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य मुंबई विभाग उपाध्यक्ष श्री.संजीवन म्हात्रे यांनी एका निवेदनाद्वारे औषध व अन्न प्रशासन आयुक्त मुंबई बांद्रा यांना केली आहे, कारण दिल्ली ,हिमाचल प्रदेश, तामिळनाडू व सिक्कीम या राज्या मधे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेल्या विद्यार्थ्यांना बी फार्मसी नंतर औषध निरीक्षक या पदासाठी परीक्षा देऊ शकतात त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना नोकरी मिळते, तसेच महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य मुंबई विभाग उपाध्यक्ष श्री. संजीवन म्हात्रे यांनी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून उपस्थित केला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उप् मुख्यमंत्री ,आरोग्यमंत्री ,अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी महाराष्ट्र देखील बी फार्मसी नंतर औषध निरीक्षक या पदासाठी अनुभवायची असलेली अट बंद करावी व औषध निरीक्षक या पदासाठी परीक्षा देता येईल, अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा कारण या अटीमुळे जवळजवळ लाखोच्या वर विद्यार्थी नोकरीपासून वंचित आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे२७ नोव्हेंबर २०२१ रोजी परिपत्रक नंबर २२५/२०२१ नुसार ८७ जागा औषध निरीक्षक या पदासाठी काढण्यात आल्या होत्या मात्र तीन वर्षाच्या अटी मुले या जागा भरल्या गेल्या नाही. कारण अन्न व औषध प्रशासन कलम १९४५ व नियम ४९ नुसार नियुक्ती झाल्यानंतर अनुभवाची अट लागू होते,म्हणून महाराष्ट्र शासनाने याबाबत अनुभवाची अट रद्द केल्यास अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडून येईल व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल असे मुंबई विभाग उपाध्यक्ष संजीवन म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.


Bundelikhabar

Related posts

१२व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार शुभारंभ

Bundeli Khabar

‘गोकुळ’ला पाच लेअरचं सुरक्षाकवच

Bundeli Khabar

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन

Bundeli Khabar
error: Content is protected !!