22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » जबरी चोरी (चैन स्नॅचिंग ) करणाऱ्या आरोपीला कळवा पोलीसांनी अटक करून ३ गुन्हे उघडकीस आणले
महाराष्ट्र

जबरी चोरी (चैन स्नॅचिंग ) करणाऱ्या आरोपीला कळवा पोलीसांनी अटक करून ३ गुन्हे उघडकीस आणले

प्रमोद कुमार
ठाणे :- कळवा पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून जबरी चोरीचे / चैन स्नॅचिंगचे प्रमाण वाढत असल्याने, मा. पोलीस उपायुक्त सो परिमंडळ. १ ठाणे शहर यांनी वाढत्या जबरी चोरीच्या गुन्हयावर अंकुश निर्माण करण्याच्या व आरोपी अटक करून सोन साखळी चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत बाबत सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास सोन साखळी चोरी करणाऱ्या आरोपींस अटक करण्याबाबतचा आराखडा करून, त्याप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्याप्रमाणे कळवा परिसरात गुन्हा घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही प्राप्त करून, त्याप्रमाणे पाहीजे आरोपीताचा शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उप निरीक्षक महेश कवळे व त्यांच्या पथकास गुप्त बातमीदारा मार्फत माहीती प्राप्त झाली की, चैन स्मॅचिग चोर कावेरी सेतू कळवा परिसरात येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कावेरी सेतु परिसरात योग्य तो सापळा रचुन, आरोपी शकर गजुकुमार प्रताप ऊर्फ कांबळे, वय-२० वर्षे, रा.डॉ.आंबेडकर मैदानाजवळ, मफतलाल झोपडपट्टी, शांतीनगर, कळवा पुर्व ठाणे यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचा साथीदार नामे हिप्पो ऊर्फ गणेश हा त्याच्याकडे असलेल्या मोटार सायकलवरून पळुन गेला. आरोपीत नामे शंकर राजुकुमार प्रताप ऊर्फ कांबळे, वय-२० वर्षे, यास कळवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि क । ४१४/ २०२१ भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे दाखल गुन्हयात दिनांक १२/१२/ २०२१ रोजी अटक करून त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करून कळवा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले जबरी चोरी/ चैन स्नॅचिंगचे ३ गुन्हे उघडकीस आणले असुन एकुण १,३८,००० /-रूपये किमतीचे सोन्याचे दागिणे अटक आरोपीताकडून जप्त करण्यात आलेले आहेत.

उघडकीस आलेले गुन्हे १) कळवा पोलीस स्टेशन, ठाणे शहर गु.रजी नंबर [ ०७/२० २१, भा.द.वि कलम ३९२,३४ प्रमाणे. २) कळवा पोलीस स्टेशन, ठाणे शहर गु.रजी.नंबर । १३३/ २०२१, भा.द.वि कलम ३९२,३४ प्रमाणे.
३) कळवा पोलीस स्टेशन, ठाणे शहर गु.रजी.नंबर । ४१४/२०२१, भा.द.वि कलम ३९२,३४ प्रमाणे. सदरची कामगिरी ही मा अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर श्री अनिल कुंभारे, मा पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, ठाणे शहर श्री अविनाश अंबुरे, मा सहाय्यक पोलीस आयुक्त, कळवा विभाग श्री व्यंकट आंधळे यांचे मार्गदर्शनाखाली कळवा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनोहर आव्हाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री सुदेश आजगांवकर, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, सहा.पो उपनिरी / मंगेश महाजन, पो.हवा. । २६९३ प्रदीप शिंदे, पो हवा./२०७९ गणेश रामराजे, पो.ना./४१७४ संदीप महाडीक, पो.ना./ ४९०९ सुनिल गुरव व पो अं./७६४८ शिवाजी केकाण यांनी केली आहे.

Related posts

भाजपातर्फे श्रमिकांना ई-श्रम कार्ड

Bundeli Khabar

जनप्रतिनिधियों की लोकप्रियता में सुनील प्रभू तीसरे नंबर पर

Bundeli Khabar

शेमारू हिंदू भजन स्पीकर’ से त्यौहारों के उल्लास को बनाएं विशेष

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!