37.8 C
Madhya Pradesh
April 29, 2024
Bundeli Khabar
Home » बदलापूर,ठाणे,महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार लक्ष्मण राजे यांना प्रदान
महाराष्ट्र

बदलापूर,ठाणे,महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार लक्ष्मण राजे यांना प्रदान

प्रेरणा फाउंडेशन बदलापूर
बदलापूर,ठाणे,महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार लक्ष्मण राजे यांना प्रदान.

किशोर पाटील/महाराष्ट्र
बदलापूर : प्रेरणा फाउंडेशन या संस्थेच्या वतीने नुकताच ऑनलाईन राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाला.प्रेरणा फांउडेशन च्या संस्थापिका/अध्यक्षा दीप्ती(प्रेरणा)गांवकर यांनी प्रेरणा फांउडेशन चे सचिव वैभव कुलकर्णी व खजिनदार दिव्या गांवकर यांच्या सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन केले होते. तसेच प्रेरणा फाउंडेशन ही एक सामाजिक बांधिलकी ची जाणीव ठेवून सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था असून शैक्षणिक सामाजिक कला क्षेत्र पत्रकारिता अशा सर्व क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने गेली तीन वर्षे सतत गोरगरीब गरजूंना, भटक्या लोकांना, अनाथ, आजारी लोकांना मदत करणे,आदिवासी पाडे सुधारणे, आदिवासी गावात रस्ता, वीज, पाणी याची सोय करणे,नद्या, चौपाटी, एस.टी डेपो,रेल्वे स्टेशन, रस्ते अशा ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले आहेत. तसेच कोरोना काळात प्रेरणा फाउंडेशन अहोरात्र सदैव मदत कार्य करीत होते.तीन आदिवासी पाडे दत्तक घेऊन अन्नधान्य, जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले.300 गोरगरीब विद्यार्थ्यांना संगणक वाटप केले.अशा या सामाजिक संस्थेच्या सामाजिक कार्याची महाराष्ट्रातील पत्रकारांनी दखल घेऊन सतत प्रसिद्धी केली आहे.कोरोना काळात माझा समाज माझी जबाबदारी या सामाजिक जबाबदारी चे भान ठेवून ज्या पत्रकारांनी आपले कार्य योग्य प्रकारे पार पाडले त्या सर्व नामांकित मान्यवर पत्रकारांचा या पुरस्कार सोहळ्यात यथोचित गौरव करण्यात आला.या प्रसंगी संस्थापिका /अध्यक्षा दीप्ती ( प्रेरणा )गावंकर यांनी एकूण ४४ पत्रकाराना पुरस्कार प्रदान केले.पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ही दिल्या।

Related posts

एमजी मोटर ने लॉन्च किया मेटावर्स प्लेटफॉर्म ‘एमजीवर्स’

Bundeli Khabar

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे उद्घाटन संपन्न

Bundeli Khabar

कस्तूरबा हॉस्पिटल में गैस लीक का मामला आया सामने

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!