23.3 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » गोदरेज अप्लायन्सेसला ‘एज अल्टीमा – स्टीलनॉक्स’ वॉशिंग मशीनसाठी मिळाला सीआयआय डिझाईन एक्सलन्स पुरस्कार २०२१
व्यापार

गोदरेज अप्लायन्सेसला ‘एज अल्टीमा – स्टीलनॉक्स’ वॉशिंग मशीनसाठी मिळाला सीआयआय डिझाईन एक्सलन्स पुरस्कार २०२१

संतोष साहू/महाराष्ट्र,

• ग्राहकोपयोगी वस्तू विभागात सर्वंकष विजेता म्हणून गोदरेज अॅप्लायन्सेसला मिळाली मान्यता

मुंबई : गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉयसने आपली व्यवसायशाखा असलेल्या गोदरेज अॅप्लायन्सेसला ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी उत्पादन रचना विभागात अलिकडेच सादर करण्यात आलेल्या ‘एज अल्टीमा – स्टीलनॉक्स’ वॉशिंग मशीनसाठी सीआयआय डिझाईन एक्सलन्स पुरस्कार २०२१ मिळाल्याचे जाहीर केले.

पुरस्कारासाठी असलेल्या प्राथमिक मुल्यांकन निकषांमध्ये सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णता, मानवी दृष्टीकोन, शाश्वतता यांचा समावेश होता. मूल्यांकनाचे हे सर्व निकष पार पाडताना ग्राहकोपयोगी वस्तू विभागात सर्वंकष विजेता म्हणून गोदरेज अॅप्लायन्सेसला मान्यता मिळाली. भारतात नवीन डिझाईन्सची कवाडे निर्माण करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या संस्थांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.
गोदरेज एज अल्टीमा – स्टीलनॉक्स मध्ये सौंदर्यशास्त्र, टिकावूपणा आणि शाश्वतता या गोष्टींचे परिपूर्ण मिश्रण आहे. याचे हळूवार उघडबंद होणारे, रंगछटा असलेले जाड काचेचे झाकण यासह आगळेवेगळे कडाविरहीत डिझाईन आहे. जोडीला, कंट्रोल पॅनेल मजबूत काचेने सुरक्षीत असल्यामुळे पाणी आत जाणार नाही याची खात्री आहे. वॉश आणि स्पिन साठीचे दोन्ही ड्रम गंजविरहीत स्टेनलेस स्टीलने बनवलेले आहेत. बेझेल डिझाईनने ग्राहकांसाठी झाकणांचा वापर सोयीचा केला आहे. पर्यावरणाशी ब्रँडची बांधिलकी जपताना या मशीनमध्ये पंचतारांकित बीईई मानांकन आहे. त्यामुळे ऊर्जा आणि पाणी यांचे जतन व्हायला मदत होते. स्पर्धात्मक युगात ही नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यं आणि रचना या मशीनला उच्च कामगिरी उत्पादन बनवितात. हे मशीन क्रिस्टल ब्ल्यू आणि क्रिस्टल ग्रे अशा दोन आकर्षक रंगांमध्ये येते.

पुरस्कार स्वीकारताना गोदरेज अॅप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, “नाविन्यपूर्णता, ग्राहककेंद्री दृष्टीकोन आणि पर्यावरण यांवर आमचा असलेला अथक भर याने आम्हांला एज अल्टीमा – स्टीलनॉक्स सारखे पुरस्कार विजेते उत्पादन बनवायला सक्षम केले आहे. या मान्यतेमुळे आमच्या टीमला ग्राहकांसाठी अधिकाधिक नाविन्यपूर्ण उत्पादने बनवायला प्रेरणा मिळेल. ‘सोच के बनाया है’ या आमच्या ब्रँड तत्वज्ञानाशी हे सुसंगतच आहे. आम्ही लोक आणि पायाभूत सुविधा अशा दोन्ही गोष्टींसंदर्भात उत्पादन डिझाईनमध्ये गुंतवणूक करत आहोत आणि ब्रँडसाठी त्याची चांगली फळं मिळत आहेत.”

त्यांचा मुद्दा पुढे नेताना गोदरेज अप्लायन्सेसचे वॉशिंग मशिन्सचे उत्पादन समूह प्रमुख राजिंदर कौल म्हणाले, “आमच्या नाविन्यपूर्णतेला मिळालेली दाद म्हणून या मान्यतेकडे बघताना आम्हांला खूप आनंद झाला आहे आणि विविध विभागांत आमच्या ग्राहकांसाठी नवीन आणि प्रगत उत्पादने बनविण्यासाठी आम्ही बांधील आहोत. एज अल्टीमा – स्टीलनॉक्स मशीन सेमी ऑटोमॅटीक विभागात ग्राहकांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे आणि वॉशिंग मशिन्सच्या सगळ्या विभागांत आणखी अशी उत्पादने सादर करण्यात येणार आहेत.”

Related posts

भारतातील कथाकारांच्या पुढील पिढीला पाठिंबा देण्यासाठी:‘नेटफ्लिक्स इंडिया’तर्फे ‘टेक टेन’ची घोषणा

Bundeli Khabar

आईवूमी एनर्जी की इलेक्ट्रिक स्कूटरों पर त्यौहारी छूट

Bundeli Khabar

द बॉडी शॉप ने लॉन्च किया नई स्किनकेयर रेंज

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!