27.9 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » भारतातील कथाकारांच्या पुढील पिढीला पाठिंबा देण्यासाठी:‘नेटफ्लिक्स इंडिया’तर्फे ‘टेक टेन’ची घोषणा
व्यापार

भारतातील कथाकारांच्या पुढील पिढीला पाठिंबा देण्यासाठी:‘नेटफ्लिक्स इंडिया’तर्फे ‘टेक टेन’ची घोषणा

संतोष साहू,

मुम्बई : ‘नेटफ्लिक्स इंडिया’ने ‘टेक टेन’ या नावाची एक लघुपट कार्यशाळा आणि स्पर्धा जाहीर केली आहे. भारतातील विविधांगी पार्श्वभूमी असलेल्या उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना शोधणे आणि त्यांना पाठबळ देणे हा या उपक्रमामागील कंपनीचा उद्देश आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, 10 चित्रपट निर्मात्यांना सर्जनशील उद्योगातील सर्वोत्कृष्ट व्यक्तींच्या कार्यशाळेत उपस्थित राहण्याची आणि नंतर 10 हजार डॉलर्सच्या अर्थसहाय्याने लघुपट बनविण्याची रोमांचक संधी दिली जाईल. हे चित्रपट ‘नेटफ्लिक्स’च्या ‘इंडिया यूट्यूब चॅनल’वर प्रदर्शित केले जातील.

‘टेक टेन’ हा उपक्रम ‘नेटफ्लिक्स फंड फॉर क्रिएटिव्ह इक्विटी’द्वारे प्रायोजित आहे. दूरचित्रवाणी व चित्रपट या उद्योगांमध्ये कमी प्रतिनिधीत्व असलेल्या समुदायांना संधी देण्याच्या दृष्टीने जगभरात कार्यक्रम सादर करण्याकरीता गेल्या 5 वर्षांत दरवर्षी 100 दशलक्ष डॉलर्सची तरतूद या संस्थेने केली आहे.
“आम्ही भारतात ‘टेक टेन’ उपक्रम सादर करण्यास उत्सुक आहोत. ही एक लघुपट कार्यशाळा आणि स्पर्धा आहे. भारतातील कोणत्याही भागातील इच्छुक चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या कथा मांडण्याची संधी यातून मिळेल. ‘टेक टेन’ उपक्रमाला ‘नेटफ्लिक्स’च्या ‘फंड फॉर क्रिएटिव्ह इक्विटी’चे पाठबळ आहे. उत्तम कथा कोठूनही येऊ शकतात आणि उद्योगातील सर्वोत्तम व्यक्तींकडून प्रशिक्षण घेण्याची नवीन संधी निर्माण करता येते, हे या उपक्रमातून आम्हाला दाखवून द्यायचे आहे,” असे ‘नेटफ्लिक्स’च्या एशिया पॅसिफिक क्षेत्राच्या ‘एक्सटर्नल अफेअर्स’ विभागाच्या प्रमुख एमी सविता लेफेव्हरे यांनी सांगितले.
“टेक टेन हा कथाकथनाचा आणि नाविन्यतेचा उत्सव आहे. सर्वसमावेशकता बाळगणे आणि कॅमेऱ्याच्या मागून व पुढून भारतातील विविध संस्कृतींचे प्रदर्शन मांडणे हे यातील कार्यशाळेचे व स्पर्धेचे उद्दिष्ट आहे,” असे चित्रपट समीक्षक, लेखिका आणि ‘फिल्म कम्पॅनियनच्या’ संपादिका अनुपमा चोपड़ा यांनी नमूद केले. त्या स्वतः या उपक्रमाचे नेतृत्व करीत आहेत. “मला आशा आहे की ‘टेक टेन’ या उपक्रमातून संपूर्ण भारतातील कलाकारांना पाऊल पुढे टाकण्यास व वाटचाल सुरू करण्यास मदत होईल,” असेही त्या म्हणाल्या.
‘टेक टेन’साठी अर्ज करण्याचे नियमः
• भारतातील कोणीही अर्ज करू शकतो.
• यामध्ये सामील होण्यासाठी केवळ दोन निकष आहेत: अर्जदार भारताचा नागरिक किंवा रहिवासी असावा, तसेच त्याचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
• याची नोंदणी दि. 7 फेब्रुवारी 2022 रोजी www.taketen.in या वेबसाईटवर सुरू होईल. प्रवेश करण्यासाठी, अर्जदारांनी ‘माय इंडिया’ या विषयावर आधारित दोन मिनिटांपर्यंतचा चित्रपट सादर करावा. हा चित्रपट त्यांनी आपल्या फोनमधून चित्रीत करणे आवश्यक आहे. तसेच, या चित्रपटातून निर्माता म्हणून आपण कोण आहोत, याचे प्रतिनिधित्व व्हायला हवे. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार अर्जांची तपासणी होईल.
• निवडक स्पर्धकांना त्यांच्या शॉर्ट फिल्मची कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी तर मिळेलच, त्याशिवाय अभिषेक चौबे, हंसल मेहता, जुही चतुर्वेदी, नीरज घायवान व गुणीत मोंगा आदी पुरस्कार विजेत्या प्रतिभावंतांकडून लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि इतर अनेक गोष्टी शिकण्याची संधीही मिळेल.
• कॅमेऱ्याच्या मागे काम केल्याने कॅमेऱ्याच्या पुढे उभे राहण्याचा आत्मविश्वास येतो. कथाकारांच्या पुढच्या पिढीला त्यांच्या कथांद्वारे स्वतःचा आवाज आणि दृष्टीकोन मांडण्यासाठी एक व्यासपीठ देऊन, अधिक समावेशक सर्जनशील उद्योग तयार करणे, हे ‘टेक टेन’चे उद्दिष्ट आहे.

Related posts

एंजेल ब्रोकिंगची रिब्रँडिंगवरील टीव्हीसी सादर,डिजिटल ब्रोकरचा ‘एंजेल वन’मध्ये बदलाचा प्रवास दर्शवतात

Bundeli Khabar

एमजी मोटर की सीमेंस के साथ साझेदारी

Bundeli Khabar

जीसीपीएल ने लॉन्च किया गोदरेज मैजिक बॉडीवाश, शाहरुख खान बने ब्रांड एंबेसडर

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!