25.9 C
Madhya Pradesh
July 27, 2026
Bundeli Khabar
IMG 20211216 WA0015
महाराष्ट्र

दगड विटांच्या स्मारकातून माणूस मोठा होत नसतो तर तो त्याच्या विचारातून मोठा होतो – सुरेश पाटील

Bundelikhabar

अण्णांच्या आशीर्वादाने त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन अनेक जण वेगवेगळ्या क्षेत्रात उंच भरारी घेऊन पुढे गेले आहेत – डॉ. रुपाली कराळे
माझ्या वडिलांना दिलेला जीवन गौरव पुरस्कार मला स्वीकारण्याचे भाग्य मिळाले – डॉ.संदेश म्हात्रे
माझ्या अण्णांचा जन्म मला, गोरगरिबांना न्याय आणि शिक्षण देऊन गेला – डॉ. नवनीत म्हात्रे
अण्णासाहेबांचा ९८ वा जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न!

भिवंडी : कोन गाव भिवंडी तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे, लोकप्रिय नेते आगरी समाजाचे पुरोगामी समाज सेवक, सहकार भूषण, शिक्षण योगी, महाराष्ट्र शासनाने गौरविलेले शेतीनिष्ठ व निस्पृह राजनेता स्वर्गीय. गजानन पांडुरंग पाटील (अण्णासाहेब) यांच्या ९८ व्या जयंती महोत्सवानिमित्ताने भिवंडी तालुक्यातील विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या गुणवंत ,बुद्धिवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात गजानन पांडुरंग पाटील कला ,विज्ञान ,आयटी व वाणिज्य महाविद्यालय कोन गाव येथील सभागृहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थाअध्यक्ष श्री. सुरेश दादा पाटील यांनी भूषविले होते, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आण्णांचे जोडीदार.. कृष्णा बाळू पाटील गुरूजी, कोन ग्रामपंचायतीच्या सरपंच डॉ. रुपाली अमोल कराळे
उपसरपंच..श्री.भरत जाधव,सौं.राजश्री घोरपडे उपनगराध्यक्ष बदलापूर,
सौं.प्रमिला पाटील नगरसेविका बदलापूर, सर्व ग्रा.पं. सदस्य,श्रीमती कविता ताई भगत माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे, श्री. महादेव घरत माजी उपसभापती पंचायत समिती भिवंडी,श्री. गिरीश विठ्ठल म्हात्रे माजी पंचायत समिती सदस्य भिवंडी, डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील संपादक दैनिक स्वराज्य तोरण तथा कोकण विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, डॉ. संदेश बाळासाहेब म्हात्रे मुंबई,डॉ.नवनित विठ्ठल म्हात्रे शिवम हॉस्पिटल मानकोली नाका, प्राचार्य श्री.राजेश देसले,श्री. रमेश कराळे सचिव आगरी समाज मंडळ भिवंडी, आदी मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते, आपणा सर्वांना पाहुण मला अण्णांचे व आईचे रूप स्वरूप तुमच्या रुपात पहावयास मिळाले, श्री. बाळासाहेब म्हात्रे यांनी मुंबईमध्ये राहून आपल्या आगरी समाजाचे नाव उज्वल केले, त्यामुळे यावर्षीचा गजानन पांडुरंग पाटील (अण्णासाहेब) जीवन गौरव पुरस्कार त्यांना जाहीर केला व सर्वांच्या उपस्थितीत त्यांना आज प्रदान करण्यात आला. आमच्या अण्णांना पिंपळस गावातील माजी सरपंच स्वर्गीय शिवराम म्हात्रे यांच्या मुळे संपूर्ण गावाचा पाठिंबा मिळत होता, आमची बहिण ज्यावेळी अण्णांच्या विषयी गौरव करत होती त्यावेळी तिच्या तोंडून आईचे बोल आम्हाला ऐकायला मिळाले, म्हणून अश्रू अनावर झाले होते, सर्वानुमते महाविद्यालय सुरू करण्याचे ठरवले गेले व त्या महाविद्यालयाला अण्णांचे नाव देण्याचे ठरले मी मात्र विरोध केला त्यांना सांगितले की, आपण अण्णांचे वारसदार म्हणून यांच्या विचारांचे पाईक असाल तरच त्याला अण्णांचा वारसा आहे असं म्हटलं जाईल, म्हणून आमची आई सांगायची दगड विटांच्या स्मारकातून माणूस मोठा होत नसतो तर तो त्याच्या विचारातून मोठा होता असे यावेळी श्री. सुरेशदादा पाटील यांनी सांगितले.
आदरणीय अण्णांच्या पवित्र स्मृतीस , त्यांच्या महान् कार्यास
व आदर्शवत अशा विचारांना माझं अभिवादन मितर अण्णाना पाहिलं नाही, मात्र त्यांच्या विचारांना आज मी वाचलं व प्रत्यक्ष पाहिलं, त्याने पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरत आहे त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आम्हाला जाणीव होत आहे जर कोणी मला विचारलं हयात नसलेल्या कोणत्या व्यक्तीला आपल्याला भेटावसं वाटतं तर मी सांगेन की मला अण्णांना भेटावसं वाटतं आज अण्णांच्या आशीर्वादाने त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन अनेक जण वेगवेगळ्या क्षेत्रात उंच भरारी घेऊन पुढे गेले आहेत्.असे सरपंच डॉ. रूपाली अमोल कराले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, अण्णांनी सर्व कोण वासियांना मार्गदर्शन केले व त्यांचा सहवास माझ्या वडिलांना लाभला हे आमचे भाग्य,व आज् मला त्यांनी मार्गदर्शन केले म्हणून मी इथं पर्यंत पोचलो. बरेच दिवसापासून कोन गावला येण्याचा विचार होता पण तों आज पुरस्काराच्या रूपाने पूर्ण झाला मैदानी खेळाचे गाव म्हणून कोनगावचे नाव आहे मैदानी खेळ हे कोनगावलाच बघायला मिळतात माझ्या वडिलांना आपण दिलेला जीवन गौरव पुरस्कार स्वीकारण्याचे भाग्य मला मिळाले असे यावेळी डॉ. संदेश बाळासाहेब म्हात्रे त्यांनी सांगितले , लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखे असावे पण मी म्हणतो माणसाने सोन्यासारखे नसावे कारण आपण ज्याच्या ज्याच्या सानिध्यात जावं त्याचं सोनं व्हावं, असे परीसा प्रमाणे असलेले आपले अण्णा होय , ठाणे जिल्ह्यातील लोकनेते शेतीनिष्ठ आणि समाजसेवक अशा अनेक उपाध्यांनी त्यांची ओळख आहे, माझ्या अण्णांचा जन्म मला ,गोरगरिबांना, न्याय आणि शिक्षण देऊन गेला. हे सर्व शिक्षण आपल्याला शाळेतून मिळत असते म्हणून शहा म्हणजे काय तर शाळा म्हणजे विद्येचे आणि ज्ञानाचे मंदिर असतं शाळा म्हणजे शिक्षणा पोटी मिळालेलं मायेचा आधार असतो, याविषयावर अण्णांनी विचार केला आणि या विद्यालयाची स्थापना केली, आज त्यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्ष झाले आहे, आत्ताच्या जीवनात जिद्द चिकाटी मेहनत करेल तोच यशस्वी होईल असे यावेळी डॉक्टर नवनीत म्हात्रे यांनी सांगितले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री.विजयानंद बाळू पाटील व सर्व शिक्षक वर्ग यांनी केले होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून खालील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये डॉ.प्रा.सुरेश तुकाराम मढवी, डॉ.प्रा. शत्रुघ्न बबन पाटील, डॉ.प्रा. निलेश सुरेश म्हात्रे, डॉ.प्रा. संजय हनुमान नागावकर,डॉ. कु. नम्रता चौधरी , डॉ. कु. विनय नवनीत म्हात्रे, यांचा समावेश होता, या कार्यक्रमाचे सयोजन कला निकेतन शिवगर्जना मंडल, जागृती महिला मंडळ, बौध जागृती मंडळ, ज्येष्ठ नागरिक सेवा समिती, गजानन राव पांडुरंग पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कोन गाव ता. भिवंडी यांनी केले होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ..प्रा. विक्रांत ठाणगे यांनी केले तर्
आभार प्रदर्शन कु. प्रियांका विजयानंद पाटील हिने केले.


Bundelikhabar

Related posts

राज्यमंत्री विवेक पंडित यांचा कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात पाहणी दौरा

Bundeli Khabar

1/अ व 7/ह प्रभागात अनधिकृत चाळीचे व आर.सी.सी फुटिंगचे बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई

Bundeli Khabar

समाजसेवी व व्यवसायी लखमेंद्र खुराना को मिला पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविंद के हाथों ‘भारत रत्न डॉ. अम्बेडकर अवार्ड’

Bundeli Khabar
error: Content is protected !!