25.5 C
Madhya Pradesh
August 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20211216 WA0014
महाराष्ट्र

अंजुर ,माणकोळी ,दिवे अंजुर गावातील सिमेंट प्लांट बंद करण्याबाबत मनिष तरे यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Bundelikhabar

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील मौजे अंजुर ,माणकोळी ,दिवे अंजुर गाव परिसरातील सिमेंट प्लांट बंद करण्याबाबत अंजूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री मनिष तरे यांनी ठाणे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले असुन या बाबतची सविस्तर माहिती छायांकित प्रत मा.अधिक्षक प्रदूषण नियामक मंडळ कल्याण तालुका कल्याण , भिवंडीचे उपविभागीय अधिकारी,भिवंडीचे तहसीलदार, अंजुर ,माणकोळी ,दिवे अंजुर ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना दिलेली आहे.

कारण सिंमेंट प्लांट मुळे रस्त्यावरून ये-जा करणारे विद्यार्थी, प्रवासी, वाहन चालक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, कारण सदर मिक्सरप्लांट मध्ये केमिकल मिश्रित सिमेंट असल्याने नागरीक व रिक्षातून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो लहान मुलांचे डोळे चुर चुरु लागतात, त्यामुळे मुलांचे डोळे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे त्याचप्रमाणे वयोवृद्ध व्यक्तींनाही या केमिकल मिश्रित सिमेंटच्या दुर्घदिला सामोरे जावे लागत आहे.

म्हणून् लवकरात लवकर चौकशी करुन सदरचे सिमेंट प्लांट बंद करून नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती निवेदनाद्वारे माजी सरपंच श्री मनिष तरे यांनी आपल्या निवेदना द्वारे केली आहे.


Bundelikhabar

Related posts

राज्यभरात ७०० ‘बाळासाहेब ठाकरे – आपला दवाखाना’ सुरू करणार – मुख्यमंत्री

Bundeli Khabar

जब्बार’ च्या माणूसकीला व्हाट्सअप गृप चा ‘सलाम हिंदुस्मशानभूमिला मुस्लीम युवकाचा आधार, 51 हजारांचा मदतनिधी जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते सुपूर्द

Bundeli Khabar

फूड डिलीवरी के लिए हीरो लेक्ट्रो विन का उपयोग स्विगी द्वारा किया जाएगा

Bundeli Khabar
error: Content is protected !!