24.7 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20211216 WA0006
महाराष्ट्र

डॉ. नारायण दामोदर सावरकर यांचे पुत्र श्रीहर्ष सावरकर यांचे निधन

Bundelikhabar

मुरबाड (गुरुदत्त वाकदेकर) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव दामोदर सावरकर यांचे पुत्र श्रीहर्ष सावरकर यांचे बुधवारी, १५ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७.४० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.

सावरकर कुटुंबातील जुन्या पिढीतील ते अखेरचे व्यक्ती होते. मुरबाड येथे ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्याजवळ राहात होते. श्रीहर्ष सावरकर हे गरवारे पेण्ट्समध्ये नोकरीला होते. विक्रम सावरकर यांच्याबरोबर ते हिंदु महासभेचीही काम करीत होते. गेल्या काही वर्षांपासून मुरबाड येथे विक्रम सावरकर यांनी स्थापन केलेल्या आणि सध्या रणजित सावरकर चालवीत असलेल्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या परिसरातील निवासस्थानी ते राहात होते.


Bundelikhabar

Related posts

हा अभिनय माझ्या वडिलांना अर्पण, अनुपम खेर यांची ‘कू’ वर इमोशनल पोस्ट

Bundeli Khabar

एलजीबीटींसाठी होणार “रेन्बो प्राईड ऑफ इंडिया फॅशन शो”

Bundeli Khabar

जगण्याचे आर्त काव्यसंग्रहाचे रामदास फुटाणे यांच्या हस्ते प्रकाशन

Bundeli Khabar
error: Content is protected !!