22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » रोटरी क्लब आँफ भिवंडी रुरल‌ तर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर ॲवार्ड पुरस्कार देऊन सन्मान
महाराष्ट्र

रोटरी क्लब आँफ भिवंडी रुरल‌ तर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर ॲवार्ड पुरस्कार देऊन सन्मान

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी‌ : रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल तर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून भिवंडी तालुक्यातील पिंपळास ग्रामपंचायत हद्दीतील भुमीवर्ल्ड या ठिकाणी असलेल्या गोपाला हाॅटेलमध्ये शैक्षणिक सामाजिक कला- क्रीडा साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या शिक्षकांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून रविवार दि.५/९/२०२१ रोजी नेशन बिल्डर अवार्ड पुरस्कार देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला.रोटरी क्लब आँफ भिवंडी रुरलचे संस्थापक अध्यक्ष तसेच असिस्टंट गव्हर्नर रो.हरिश्चंद्र भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब आँफ भिवंडी रुरल नेहमीच नाविण्यपुर्ण उपक्रम राबवत असते.रुरलचे विद्यमान प्रेसिडेंट जगदीश पाटील,सक्रेटरी संजय गोणगे यांनी पदभार सांभाळल्यापासून महिनाभरात विविध उपक्रम रोटरी रूरलने राबविण्यात आले आहेत.ठाणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.श्रेया गायकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.तसेच यावेळी‌ डिस्ट्रीक सेक्रटरी रोटेरियन सतिष भोजने , असिस्टंट गव्हर्नर रो. हरिश्चंद्र भोईर ,पडघा सेवा सोसायटीचे सभापती श्रीकांत गायकर,शिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वले,पंचायत समिती सदस्य तथा गटनेते भानुदास पाटील , राजेंद्र भोईर यांच्या हस्ते उपस्थित सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला।

मुख्यता ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या विजयश्री गवळी, दिलीप संखे, पुष्पावती भोईर, रेखा गगे, श्रद्धा पाटील, साधना पष्टे, अमिता जोशी, महेंद्र पाटील, अजय पाटील, कमल चौधरी, किशोर पाटील, शरद जाधव, मेघनाथ तरे, सुरेंद्र पाटील या शिक्षकांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात आला होता.यावेळी केंद्र प्रमुख प्रिया पाटील, रोटरी रूरलचे माजी अध्यक्ष जगदिश म्हात्रे ,प्रमोद म्हात्रे, प्रभाकर पाटील, राजेंद्र भोईर, प्रेमनाथ नाईक, संदीप म्हात्रे, पंकज तरे,विश्वनाथ पाटील, राम घरत, विनय पाटील, , बिपीन पाटील, पंढरीनाथ पाटील, नितीन पाटील,राम म्हात्रे, राजू बेलेकर, संदेश भोईर, पूजा मर्क॔ड,रोशन तरे,श्रीरंग पाटील, अविनाश दिगासकर भरत पाटील इत्यादी रोटेरियन सभासदांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगदीश म्हात्रे व प्रेमनाथ नाईक यांनी केले।

Related posts

ग्रंथपालन परीक्षेच्या फेर गुणमोजणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Bundeli Khabar

अक्सर चर्चा में रहने वाले आरटीओ साहब

Bundeli Khabar

भाजपा उत्तर भारतीय मोर्चा के चिराग गुप्ता बने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!