30.9 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » शाळेची फी न भरल्यामुळे विद्यार्थिनीला शालेय पोषण आहारापासून ठेवले वंचित
महाराष्ट्र

शाळेची फी न भरल्यामुळे विद्यार्थिनीला शालेय पोषण आहारापासून ठेवले वंचित

संदीप शेंडगे/मुम्बई
टिटवाळा : टिटवाळा येथील सरकारमान्य अनुदानित शकुंतला विद्यालयाने एका ६ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला कोरोना काळात शिक्षण शुल्क न भरल्यामुळे दैनंदिन शालेय पोषण आहार पासून वंचित ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कु. हर्षिका चौधरी इयत्ता सहावी मध्ये शकुंतला विद्यालयात शिक्षण घेत होती मागील वर्षी कोरोनाची भयंकर परिस्थिती असल्याने या विद्यार्थिनीच्या पालकांना शैक्षणिक फी भरता आली नाही. अनेक पालकांना आपले रोजगार गमावल्याने तसेच आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याने शाळेची फी भरता आली नाही. येथील मुख्याध्यापकांनी तुघलकी निर्णय घेत ज्या विद्यार्थ्यांनी शाळेची फी भरली नाही त्यांना पोषण आहार देऊ नये असा फतवाच काढला. इयत्ता सहावीत शिकत असलेल्या कुमारी हर्षदा चौधरी या विद्यार्थिनीला वर्षभर शालेय पोषण आहार दिला नाही. आपल्या मुलाला वर्षभर शालेय पोषण आहार न दिल्यामुळे तसेच फ्री साठी सारखा तगादा लावत असल्यामुळे तसेच सतत मानसिक त्रास देत असल्याने पालकांनी सरकार मान्य अनुदानित शकुंतला विद्यालय सोडण्याचा निर्णय घेतला. यावर्षी चौधरीनी त्यांनी आपल्या मुलीला विद्यामंदिर मांडा या शाळेत इयत्ता ७ वी प्रवेश दिला आहे. कायदेशीर बाब म्हणून विद्या मंदिरमांडा शाळेत दाखला आवश्यक असल्याने पालकांनी शकुंतला विद्यालयातील मुख्याध्यापकांना शाळा सोडल्याचा दाखला देण्याची विनंती केली परंतु सहावी ची फी जोपर्यंत तुम्ही भरत नाही तोपर्यंत दाखला न देण्याची भूमिका मुख्याध्यापक व शाळा शाळा प्रशासनाने घेतली आहे. आगोदर ६ वीची संपूर्ण शिक्षण शुल्क भरा तरच दाखला देवू अशी बेकायदेशीर अडवणुकीची भुमिका शाळेने घेतली आहे. शकुंतला विद्यालय हे अनुदानित असूनही विद्यार्थ्यांची येथे मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जात आहे.

शालेय पोषण हा विद्यार्थ्यांचा हक्क असून कोणत्याही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारापासून वंचित ठेवू नये असे शासनाचे धोरण असताना शकुंतला विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनीचा शालेय पोषण आहार कोणत्या नियमा नुसार थांबविला ? विद्यार्थ्यांचे शारीरिक मानसिक नुकसान का केले ? याला कोण जबाबदार असा सवाल टिटवाळा एज्युकेशन कल्याणकारी फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय देशकर यांनी उपस्थित केला आहे. एज्युकेशनल कल्याणकारी फाऊंडेशनने शाळेच्या शासनमान्य अनुदानाची सखोल चौकशी करुन मुख्याध्यापकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कडोंमपा शिक्षणाधिकारी जे.जे. तडवी यांच्याकडे केली विजय देशकर यांनी केली आहे. त्यामुळे शाळेची फी भरण्यासाठी तुघलकी निर्णय घेणाऱ्या विद्यार्थिनीचा शालेय पोषण आहार बंद करून विद्यार्थ्यांचे शारीरिक नुकसान करणाऱ्या मुख्याध्यापक लावा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग काय कारवाई करतो याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

Related posts

नवरात्रोत्सव के उपलक्ष्य में शिवशांति प्रतिष्ठान द्वारा माँ कुष्मांडा के हाथों किया गया पौधरोपण

Bundeli Khabar

संवेदनांची वेदना

Bundeli Khabar

भिवंडीत आगरी कोळी मेडिकोज तर्फे गौरव सोहळा संपन्न

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!