30 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20211115 WA0013
महाराष्ट्र

भिवंडीत आगरी कोळी मेडिकोज तर्फे गौरव सोहळा संपन्न

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : आगरी कोळी मेडिकोज तर्फे आगरी कोळी समाजातील अनेक गुणवंत डॉक्टरांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला डॉ. रवींद्र शिसवे ( IPS ) पुणे सहआयुक्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आगरी कोळी समाजातील व्यक्ती आज अनेक मोठ्या पदांवर विराजमान झाले आहे आपल्या बुद्धी कौशल्याने त्यांनी अनेक विभागात आपलं नाव लौकिक केल आहे त्याच बरोबर समाजाचं सुद्धा नाव लौकीक केला आहे. आगरी कोळी मेडिकोज तर्फे  कोनगाव येथील सेरीमनी बँक्वेट हॉल मध्ये 2020 मध्ये युपीएससी उत्तीर्ण  श्री.प्रतिक जुईकर यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
     
      या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते प्रतिक जुईकर यांनी आपल्या वयाच्या 27 व्या वर्षी यु पी एस सी उत्तीर्ण झाल्याचा मान आगरी कोळी समाजातील मानकरी ठरला आहे आज आगरी कोळी समाजातील व्यक्ती अनेक मोठमोठ्या हुद्द्यावर झाला आहे.जसे उद्योजक,डॉक्टर, वकील, प्रशासकीय अधिकारी,तसेच विविध क्षेत्रात आगरी कोळी समाजातील व्यक्ती या विराजमान झाल्याने आगरी कोळी समाजाचा मान सुद्धा उंचावला आहे. आगरी कोळी समाजातील या आगरी कोळी मेडिकोज तर्फे ठाणे,रायगड, पालघर, मुंबई  अशा विविध ठिकाणच्या आगरी कोळी समाजातील डॉक्टरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

   या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे व ठाणे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, खाजगी सचिव मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र अशोक पाटील व इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.  या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आगरी कोळी मेडिकोज चे अध्यक्ष डॉ.दिनेश म्हात्रे, सचिव डॉ.जयेश शेळके डॉ. संजीव म्हात्रे डॉ. शशांक पाटील व मेडिकोजचे विविध पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला.


Bundelikhabar

Related posts

द एकेडमी स्कूल के छात्रों का रोंगटे खड़ा करने वाला रोमांचकारी अनुभव

Bundeli Khabar

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्याचा सहा महिन्यांचा कृती आराखडा तातडीने सादर करा – जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

Bundeli Khabar

शील-कलवा-मुंब्रा के 250 बड़े ग्राहकों का बिजली बिल करीब रु. 6 करोड़ अभी भी बकाया

Bundeli Khabar
error: Content is protected !!