31 C
Madhya Pradesh
May 20, 2024
Bundeli Khabar
Home » प्रख्यात अभिनेते पीयुष यांच्या कविता कू वर दाखल
मनोरंजन

प्रख्यात अभिनेते पीयुष यांच्या कविता कू वर दाखल

संतोष साहू/महाराष्ट्र,

मुम्बई। प्रसिद्ध अभिनेता, लेखक, संगीतकार आणि कवी अशी वैविध्यपूर्ण ओळख असलेले कलावंत पीयुष मिश्रा आता दाखल झाले आहेत ‘कू’वर! भारताचा बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग मंच असलेल्या ‘कू’वर मिश्रा चाहत्यांसोबत थेट संवाद करतील. सोबतच ते त्यांच्या कविता, गाणी, विचार शेअर करत ‘कू’वर अनोखे रंग भरतील. त्यांनी त्यांच्या @itspiyushmishra या हँडलवरून हिंदीमध्ये पोस्ट केली आहे.
‘थोड़ा नजारा, चटपट बातें
यही कहानी, आते जाते
थोड़ी हंसी हैं, थोड़े लतीफे
थोड़ा तराना, चटपट बातें…
बस यारो यहीं बाते, कहानियां, तराने और लतीफे अब ‘कू’ पर करेंगे।’
‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ (NSD) चे पदवीधर असलेल्या मिश्रा यांनी त्यांच्या कारकिर्दीला थिएटर अभिनेता म्हणून सुरुवात केली. १९९८ मध्ये मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘द लिजेंड ऑफ भगतसिंग’, ‘मकबूल’, ‘गुलाल’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.

मंचावर पीयुष मिश्रा यांचे स्वागत करताना, ‘कू’च्या प्रवक्त्याने सांगितले, “ज्येष्ठ अभिनेते, लेखक, कवी आणि संगीतकार पीयुष मिश्रा आमच्या मंचावर आल्याने आनंद होतो आहे. हा असा मंच आहे जिथे व्यक्ती आपल्या मातृभाषेमधून व्यक्त होऊ शकते. आमचा ५० टक्क्यांहून अधिक युजर हिंदीमध्ये आहे. हिंदी भाषिकांमध्ये कविता आणि साहित्याचा चाहतावर्ग मोठा आहे. पीयुषजी त्यांच्या साहित्यिक प्रतिभेसाठी ओळखले जातात. आम्हाला खात्री आहे, की ते त्यांच्या चाहत्यांशी जोडून घेण्यास आमच्या व्यासपीठाचा उपयोग करतीलच. सोबतच भारतातील उद्योन्मुख अभिनेते आणि कलाकारांसाठीही ते प्रेरणादायी ठरतील.”
आता ‘कू’ भारतीयांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्यासाठी सक्षम करणारा सर्वसमावेशक मंच बनला आहे. अनुपम खेर, कंगना रणौत, कृति सेनॉन, श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ अशी लोकप्रिय व्यक्तिमत्वं ‘कू’ अॅपचा चेहरा बनली आहेत. हे कलावंत विविध स्थानिक भाषांमधून आपल्या चाहत्यांशी थेट संवाद करत असतात.

Related posts

आयुष्मान खुराना अभिनीत ‘अनेक’ का ट्रेलर हुआ रिलीज

Bundeli Khabar

रिनी चंद्रा सोशल मीडिया में रहती हैं खूब एक्टिव, इनके बारे में जानने के लिए पढ़ें

Bundeli Khabar

संजय दत्त की फ़िल्म ‘लगे रहो मुन्ना भाई’ के पूरे हुए 15 साल

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!