31.9 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » आ. बालाजी किणीकर व ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शैक्षणिक समस्या व शालेय अनुदान विषयावर अधिकाऱ्यांशी विशेष चर्चा
महाराष्ट्र

आ. बालाजी किणीकर व ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शैक्षणिक समस्या व शालेय अनुदान विषयावर अधिकाऱ्यांशी विशेष चर्चा

मनिलाल शिंपी/महाराष्ट्र
ठाणे : राज्यातील विविध शैक्षणिक प्रश्न सुटावेत म्हणून अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी चर्चा केली त्यामधे त्रुटी पूर्तता केलेल्या मंत्रालयातील शाळांच्या अनुदान यादी बाबतीत,
२०% , ४०% अनुदानित शाळांना गेल्या दोन महिन्यांपासून पगार झालेले नाहीत त्याना त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा.
नाशिक व भंडारा जिल्ह्यात १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या नियुत्या तसेच २००५ नंतर १००% अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांचे एनपीएस खाती काढण्यासंबंधीची पे युनिट अधीक्षकांनी सक्ती केली आहे. शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत ,तसेच न्यायालयीन प्रकरण सुरू असल्याने चालू असलेली जीपीएफचे खाते बंद करून एनपीएस खाते सुरू करू नये व अन्य जिल्ह्यांमध्ये अशी सक्ती होता कामा नये.
पालघर जिल्ह्य़ामध्ये लवकरच पे युनिट कार्यालय व लेखाधिकारी कार्यालय सुरू करावे, पालघर जिल्ह्यात शिक्षण विभागात ( माध्यमिक) कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे, सातव्या वेतन आयोगा प्रमाणे रजा रोखीकरण मिळावे ,
उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या वाढीव पदांबाबत,
तसेच उपसंचालक कार्यालयात जाऊन सहाय्यक उपसंचालकांची भेट घेतली,
ठाणे पालघर व रायगड मधील २०% अनुदानित उच्च माध्यमिक कॉलेजला अनुदान मिळाले आहे .संच मान्यता सुद्धा झालेले आहेत मात्र पे युनिट कार्यालय २०% अनुदानावर शिक्षक.- शिक्षकेतरांची वैयक्तिक मान्यता नसल्याने पगार करण्यास तयार नाही,
या संदर्भात मा. शिक्षण उपसंचालकांनी अधीक्षकांना यापूर्वीच आदेश दिले आहे. त्वरित पगार करावा असेही सांगितले आहे. २०% वैयक्तिक मान्यतेची गरज नाही . सक्ती न करता पगार सुरळीत ठेवावेत म्हणून संघटनेच्या वतीने निवेदन सुद्धा देण्यात आले.
प्रलंबित शालार्थ आयडी मिळावेत, पगार बंद असलेल्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लवकर व्हावे व पगार लवकर सुरू करावा.त्रुटी पुर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांचे प्रस्ताव शिक्षण संचालक कार्यालयात त्वरित पाठवावेत.
अशा प्रकारची चर्चा करण्यात आली, यावेळी पालघर जिल्ह्य़ाचे शिक्षक सेनेचे ग्रामीण अध्यक्ष विठ्ठल गोऱे , प्रमोद विचवे , हनुमंत भगत , हरीश खारीक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते,
अशी माहिती विष्णू विशे संपर्कप्रमुख ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक सेना यांनी प्रतिनिधी श्री.मनिलाल शिंपी यांच्याशी बोलताना दिली.

Related posts

स्थानिकांच्या जमिनी लुटणारा देवदूत

Bundeli Khabar

चरित्र अभिनेते डॉ. गिरीश कर्नाड यांच्या स्मरणार्थ नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा

Bundeli Khabar

‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ निवड समितीची पुनर्रचना

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!