28.5 C
Madhya Pradesh
July 5, 2026
Bundeli Khabar
IMG 20220204 WA0010
महाराष्ट्र

भिवंडी महानगरपालिका व भिवंडी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पाणथळ दिन साजरा

Bundelikhabar

भिवंडी : जागतिक पाणथळ दिनानिमित्ताने भिवंडी महानगरपालिका व भिवंडी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. पालिकेच्या माझी वसुंधरा कार्यक्रम अंतर्गत सदर भिवंडी महाविद्यालयाच्या आवारात करण्यात आले होते. या वेळी सदर कार्यक्रमास महापालिकेच्यावतीने शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, पर्यावरण विभाग प्रमुख नितेश चोधरी, सहाय्यक संजय केणे व महाविद्यालयाचे प्राचार्य वाघ, प्राध्यापक डॉ. काकवीपुरे, प्राध्यापक पाटकर मॅडम, प्राध्यापक वारे सर इत्यादी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात डॉक्टर काकवीपुरे यांनी पाणथळ दिनाचे वैशिष्ट्ये नमूद केले. पाणीथळ म्हणजेच जलसंपदा व पर्यावरण यांचा निकटचा संबंध असल्याचे डॉक्टर काकवीपुरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नमूद केले आहे.या निमित्ताने विज्ञान शाखेतील 30 विद्यार्थ्यांची यांनी पाणथळ जागा याचे महत्व सांगणारी चित्रे काढण्यात आली. पाणथळ जागा व संवर्धन कशा प्रकारे करावे याचे महत्त्व डॉ.काकविपुरे यांनी नमूद केले. शहरातील सर्व पाणथळ जागांचे संवर्धन जतन आणि त्याचे योग्य प्रकारे निगा करणे ही जबाबदारी पालिकेची आहे आणि ती पालिका व्यवस्थितपणे पार पडेल असे पालिका शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड यांनी याप्रसंगी नमूद केले पाणथळ जागेचे संवर्धन करणे म्हणजेच एक प्रकारे चांगल्या प्रकारचे पर्यावरणाचे रक्षण करणे असा संदेश या निमित्ताने देण्यात आला आहे.या प्रसंगी सर्वांनी हरित शपथ घेऊन पाणथळ दिन साजरा केला.


Bundelikhabar

Related posts

डॉ. ग्लेन टी. मार्टिन ने डॉ. दिव्यज्योति सैकिया को प्रदान किया पुरस्कार

Bundeli Khabar

राज्यपाल सन्मानित संपादक डॉ.श्री.किशोर पाटील यांना नागपूर येथे ” जीवन गौरव २०२१ ” पुरस्कार प्रदान

Bundeli Khabar

देशभक्ति और जवानों को समर्पित अग्निशिखा मंच का ऑनलाइन कवि सम्मेलन व सम्मान समारोह सम्पन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!